Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज मंगळवारच्या दिवशी ज्येष्ठ महिन्यातील पंचमी तिथी आहे. आज या पंचमी तिथीत चंद्र अहोरात्र कर्क आणि सिंह राशीतून तसेच आश्लेषा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या चंद्रभ्रमणात आजचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा जाणार ते जाणून घेऊया.
कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. कोणतीही टोकाची भूमिका घेण्याअगोदर सुवर्णमध्य काढावा लागेल. चंद्राच्या प्रभावामुळे स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांसाठी शुभयोग आहे. नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी लाभदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.व्यापारात लाभ होईल. संपादन क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.
व्यवसायात तुम्ही केलेल्या नियोजनामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. अवखळ मनाला विवेकाचे लगाम घालावे लागतील. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळाल्यामुळे कामाची गती वाढेल. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. दुसर्याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०७, ०८.
आज अविचाराने कर्ज काढू नका. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.
अती भावना प्रधानता टाळायला हवी. नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय घेणे टाळावे. उद्योगधंद्यात आज कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक न केलेली बरी राहील. मानसिक अस्वस्थेतून मतभेद उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्यबाबतीत विशेष काळजी घ्यावी.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०४, ०६.
संबंधित बातम्या