Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीच्या लोकांचे आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीच्या लोकांचे आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीच्या लोकांचे आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Published May 01, 2024 09:37 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 1 May 2024 : आज १ मे २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज गुरू वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. पुण्यकाल सकाळपासून दुपारपर्यंत राहील. शुभ योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज चंद्रबल उत्तम असल्याने महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहिल. आपल्या वाणीचा इतरावर प्रभाव राहील. नोकरी व्यवसायात नवीन क्षितीजे साद घालतील. परंतु त्याचा खोलवर अभ्यास करणे हिताचे ठरेल. दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जादा काम करावे लागेल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्ट्या मुळे पुरेपूर फायदा होईल. 

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.

मकर: 

आज चंद्र आर्थिक बाबतीत अनुकुल असल्याने योग्य नियोजन आचुक निर्णय यामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल. आपणास आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. समाजात प्रतिष्ठा मिळेल पण त्यासाठी भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. परदेशग मनाच्या संधी येतील. तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना जाचकच होणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. 

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०१, ०५.

कुंभः 

आज चंद्र गोचरात आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नविन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. घाईगडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. चंचल स्वभावाला थोडा आळा घालावा लागेल. धडाडीने एखादे काम पूर्ण करणे या गोष्टी संभवतात. शैक्षणिक क्षेत्रात संशोधनही चांगल्या प्रकारे करू शकता. अभ्यासात प्रगती करून घेता येईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. 

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०६, ०८.

मीन: 

आज शुभ नक्षत्रातुन चंद्रभ्रमण होत आहे. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल आत्मविश्वास उंचावलेला असेल. कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. अन्यथा स्वताचे नुकसान करून घ्याल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्या कडेही कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्या मुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. 

शुभरंगः पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

Whats_app_banner