Dhanteras : धनतेरसला त्रिग्रही योग; या ३ राशीच्या लोकांसाठी लाभदायक, नशीब फळफळणार, धनलाभाचे संकेत!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanteras : धनतेरसला त्रिग्रही योग; या ३ राशीच्या लोकांसाठी लाभदायक, नशीब फळफळणार, धनलाभाचे संकेत!

Dhanteras : धनतेरसला त्रिग्रही योग; या ३ राशीच्या लोकांसाठी लाभदायक, नशीब फळफळणार, धनलाभाचे संकेत!

Updated Oct 29, 2024 09:40 AM IST

Dhantrayodashi Trigrahi Yog Impact : आज २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी दोन राजयोग आणि शुभ योग तयार होत आहेत. अशा स्थितीत पूजा आणि खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या ३ राशींसाठी धनत्रयोदशीचा दिवस अतिशय शुभ असणार आहे.

धनत्रयोदशी त्रिग्रही योगाचा लाभ
धनत्रयोदशी त्रिग्रही योगाचा लाभ

Dhanteras Trigrahi Yog Effect : धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते. या दिवशी लोक सोने, चांदी, दागिने, भांडी, वाहन, जमीन इत्यादी खरेदी करतात. या वर्षी त्रयोदशी तिथी मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ३२ मिनिटांनी सुरू होईल आणि ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी समाप्त होईल.

दरवर्षी त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. यावर्षी मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी आश्चर्यकारक योगायोग घडणार आहेत. धनत्रयोदशीला २ राजयोग आणि त्रिग्रही योग तयार होणार आहेत. या दिवशी शनि आपल्या कुंभ राशीमध्ये उपस्थित राहून शश महापुरुष राजयोग तयार करेल. त्याचबरोबर बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोगही तयार होईल. अशा परिस्थितीत धनत्रयोदशीला घडणारे हे दुर्मिळ योगायोग काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकतात. धनतेरसच्या दिवशी त्रिग्रही योग बनल्याने कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया-

धनत्रयोदशीला त्रिग्रही योग : 

यावर्षी धनत्रयोदशीला त्रिग्रही योग तयार होणार आहे. पंचांगानुसार त्रिपुष्कर योग २९ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजून ३१ मिनिटे ते १० वाजून ३१ मिनिटापर्यंत राहील, इंद्र योग २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ४८ मिनिटे ते २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटापर्यंत असेल. यासोबतच बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि शुक्राशी संयोग होईल, ज्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल.

धनत्रयोदशीचा दिवस या ३ राशींसाठी फायदेशीर आहे

तूळ

धनत्रयोदशीला त्रिग्रही योग बनणे तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. सुख-शांतीमुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील.

धनु

धनत्रयोदशीला त्रिग्रही योग तयार होणे धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कोणतेही नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी करणे खूप फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यात रुची राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो.

कर्क 

धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिग्रही योग तयार होणे कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. नवीन स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही लोक प्रवास करू शकतात. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही चैनीच्या वस्तू देखील खरेदी करू शकता.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner