Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी ५.३० वाजता घेतली शपथ, कुंडलीनुसार जाणून घेऊ या, कसे चालेल महायुतीचे सरकार?
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी ५.३० वाजता घेतली शपथ, कुंडलीनुसार जाणून घेऊ या, कसे चालेल महायुतीचे सरकार?

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी ५.३० वाजता घेतली शपथ, कुंडलीनुसार जाणून घेऊ या, कसे चालेल महायुतीचे सरकार?

Dec 05, 2024 08:14 PM IST

Devendra Fadnavis: महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीने २३५ जागा मिळवून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. हे नवे सरकार आगामी काळात कसे चालेल हे देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीवरून जाणून घेऊया.

देवेंद्र फडणवीस यांनी ५.३० वाजता घेतली शपथ, कुंडलीनुसार जाणून घेऊ या, कसे चालेल महायुतीचे सरकार?
देवेंद्र फडणवीस यांनी ५.३० वाजता घेतली शपथ, कुंडलीनुसार जाणून घेऊ या, कसे चालेल महायुतीचे सरकार?

Devendra Fadnavis:  देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी ५.३० वाजता शपथ घेतली. ते आता महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. बहुमताचे सरकार बनवणारे देवेंद्र फडणवीस यांनी आज स्थिर लग्न वृषभ स्थितीत शपथ ग्रहण केलेली आहे. गुरुवारी शुक्ल पंचमी तिथी असून सूर्यास्ताच्या वेळच्या गोधुली बेला मुहूर्त आणि चंद्राचे श्रवण नक्षत्रात असणे शुभ मानले जात आहे. पंचांगाच्या मुहूर्ताच्या नियमानुसार ध्रुव आणि करण बाव यांचा योगही चांगला आहे. सरकार स्थिर राहण्यासाठी आणि मित्रपक्षांकडून होणारी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी हे सर्व योग देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शुभ ठरतील.

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि तरुणांना रोजगार देण्यावर सरकारचा भर असेल

देवेंद्र फडणवीस यांनी वृषभ लग्नाला घेतलेली शपथ ही कुंडलीत असलेला कृषीचा कारक मानला गेलेला ग्रह शनी हा दशम भावात विराजमान झालेला आहे. हा ग्रह तिसऱ्या घरात बसलेल्या ऋणाचा कारक ग्रह मानला गेलेला ग्रह मंगळ याच्या आठव्या दृष्टीच्या प्रभावात आहे. या योगाच्या प्रभावामुळे फडणवीस सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारखे निर्णय घेऊ शकते. त्याचप्रमाणे हे सरकार शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत देखील निर्णय घेऊ शकते.

लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरून होऊ शकतो वाद

शपथ ग्रहण कुंडलीत स्त्रीकारक ग्रह शुक्र लग्नेश होऊन इतर स्त्रीकारक ग्रह चंद्राशी युती करून नवम स्थानी बसला आहे. शुक्र आणि चंद्रावर पडणाऱ्या सप्तमेश मंगळ ग्रहाच्या दृष्टीमुळे महायुती सरकारची महिलांना आर्थिक मदत देणारी लाडकी बहीण योजना सुरू राहील असे दिसते. परंतु या योजनेचे श्रेय घेण्यावरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.

शपथ ग्रहण कुंडलीत नवांशात चंद्र, मगळ आणि बुधाची परस्पर केंद्रीय स्थिती सरकारच्या स्थिरतेसाठी शुभ आहे असे दिसते. वृषभ लग्नाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथ ग्रहण कुंडलीत घटक पक्षांच्या तिसऱ्या घरात निच मंगळ आणि एकादश भावात असलेला राहु यामुळे तणावाची स्थितीही निर्माण होऊ शकते. शपथ ग्रहण कुंडलीत चतुर्थेश सूर्याचा पंचमेश बुधासोबत बनत असलेला राजयोग सप्तम भावात आहे. या बुध-आदित्य योगाच्या प्रभावाने हे सरकार लवकरच युवकांसाठी काही सरकारी योजना आणू शकते.

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म नागपूर येथे २२ जुलै १९७० साली सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी झाला. २०१४ ते २०१९ (नोव्हेंबर) या ५ वर्षांच्या कालावधीसाठी फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळी लाभाच्या अकराव्या घरात बुध ग्रहाच्या शुभ दशा होती. पुढे २०१९ च्या निवडणुकीत केतूमध्ये शुक्राची स्थिती होती. त्यामुळे ते सत्तेबाहेर होते. तर पुढे जुलै २०२२ मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेविरोधात बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. 

केतूमधील शनीची दशा

आता केतूमध्ये शनीची दशा असल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळात काही मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या कन्या राशीत शनि पाचव्या (मंत्रिपद) आणि सहाव्या (विवाद) घराचा स्वामी असल्याने आठव्या घरात विरुद्ध राजयोग निर्माण करत आहे, ज्यामुळे त्यांना असाधारण विजय मिळाला आहे आणि त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. . परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीत कुंभ राशीतील वादाच्या सहाव्या घरात राहू आणि चंद्राचा संयोग आहे, त्यामुळे शनीचे सध्याचे संक्रमण त्यांना एखाद्या वादात अडकवू शकते, असे दिसत आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner