Diwali Daan According Rashi : दिवाळी हा सण हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, आश्विन महिन्याच्या अमावास्येला, प्रभू श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येत परतले होते, त्या आनंदात अयोध्येतील लोकांनी हा दिवस तोरणं-फुलांनी सजवून, दिवे लावून तो दिवस साजरा केला.
दरवर्षी आश्विन महिन्यात दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळीचा सण हा पाच दिवसांचा असतो. हा दिव्यांचा सण आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी काही उपाय केल्यास आर्थिक स्थिती सुधारू शकते. राशीनुसार दिवाळीच्या दिवशी काही गोष्टींचे दान केल्यास ग्रहांची स्थिती मजबूत होऊ शकते. जाणून घेऊया दिवाळीच्या दिवशी काय दान करावे-
मेष- देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मेष राशीच्या लोकांनी दिवाळीला झाडू दान करावे.
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी गरीब व्यक्तीला अन्नदान करावे.
मिथुन - आज एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील.
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी आज पाणी दान करणे खूप शुभ मानले जाते.
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी आज पिवळ्या मिठाईचे दान करावे.
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी आज झाडू दान करणे खूप शुभ राहील.
तूळ- तूळ राशीच्या लोकांनी अन्नदान करावे.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या दिवशी गुळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते.
धनु- धनु राशीच्या लोकांनी दिवाळीनिमित्त पिवळ्या वस्तूंचे दान करावे.
मकर- मकर राशीच्या लोकांनी आज एखादे पुस्तक दान करावे.
कुंभ- कुंभ राशीच्या लोकांनी आज एखाद्या गरजू व्यक्तीला ब्लँकेट दान करावे.
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी आज पाणी दान करणे खूप शुभ राहील.
दिवाळी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त सुरू झाला आहे. शास्त्रामध्ये अमावस्या तिथीच्या प्रदोषव्यापिनी मुहूर्तामध्ये लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. परंतू काही ठिकाणी १ नोव्हेंबरलाच उदया तिथीनुसार लक्ष्मी पूजन केले जाईल. दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात सुख, शांती आणि संपत्तीची कमतरता नसते. अशात दिवाळीत राशीनुसार या गोष्टी दान केल्यास लक्ष्मी प्रसन्न होईल.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या