December Rashibhavishya: ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार डिसेंबर हा वर्षातील शेवटचा महिना खास मानला जातो. या महिन्यात शुक्र, सूर्य आणि मंगळासह अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार शुक्रवार, दिनांक २ डिसेंबर रोजी मकर राशीत संक्रमण करेल, तर मंगळ कर्क राशीत वक्री गती सुरू करेल. यानंतर १५ डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. डिसेंबरमधील ग्रहांचे गोचर काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल. डिसेंबरमध्ये ग्रहांच्या स्थितीत झालेला बदल अनेक राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
मेष राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महिना खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात अडथळ्यांमुळे अडकलेली तुमची कामे पूर्ण होणार आहेत. डिसेंबर महिन्यात तुमच्या जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तसचे तुमच्यासाठी आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. तुमच्या जीवनात सुखशांती निर्माण होईल.
सिंह राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महिना फायदेशीर ठरणार आहे. रोजगार आणि व्यवसायाच्या शोधात असलेल्या जातकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. डिसेंबर महिन्यात व्यापाऱ्यांसाठी लाभदायक काळ निर्माण होईल.
कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना अत्यंत शुभ असणार आहे. या काळात कन्या राशी मुले चांगली होतील. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगतीची दाट शक्यता आहे. रखडलेल्या कामांमध्ये यश मिळेल.
तुळ राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महिना सौभाग्य घेऊन येत आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला फायदा होणार आहे. तुमची डिसेंबर महिन्यात प्रभावशाली व्यक्तींची भेट होईल. त्यामुळे तुम्हाला अतिशय आनंद होईल. तुमच्या नोकरीत, तसेच करत असलेल्या व्यवसायात प्रगतीचे योग येतील.
मीन राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महिना चांगला राहणार आहे. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. तुमच्या वाटेत येणारे कोणतेही अडथळे, कार्यात येणारी कोणत्याही प्रकारची विघ्ने डिसेंबर महिन्यात दूर होतील. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.