मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Amavasya : खडतर काळ संपणार! दर्श अमावस्या 'या' राशींसाठी असणार अत्यंत शुभ, होणार लाभच लाभ

Amavasya : खडतर काळ संपणार! दर्श अमावस्या 'या' राशींसाठी असणार अत्यंत शुभ, होणार लाभच लाभ

Jul 04, 2024 12:34 PM IST

कृष्ण पक्षात येणाऱ्या १५ व्या तिथीला अमावस्या असे म्हटले जाते. अमावस्येच्या दिवशी चंद्र अवकाशात अदृश्य होतो.

अमावस्या जुलै २०२४, मिथुन मकर कुंभ राशींवर शुभ प्रभाव
अमावस्या जुलै २०२४, मिथुन मकर कुंभ राशींवर शुभ प्रभाव

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिना सुरु होईल. हिंदू धर्मात आषाढ महिन्याला प्रचंड महत्व आहे. या महिन्यात अनेक अध्यात्मिक घडामोडी घडत असतात. या महिन्यात येणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमेलासुद्धा विशेष महत्व आहे. आषाढ महिना सुरू होण्याआधी दर्श अमावस्या आहे. कृष्ण पक्षात येणाऱ्या १५ व्या तिथीला अमावस्या असे म्हटले जाते. अमावस्येच्या दिवशी चंद्र आकाशात अदृश्य होतो. या दिवसाला ज्योतिषशास्त्रात एक वेगळेच स्थान आहे. शास्त्रानुसार या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्यास ते तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. त्यामुळेच हिंदू धर्मात या अमावस्येला इतके महत्व आहे.

यंदा दर्श अमावस्या शुक्रवारी म्हणजेच ५ जुलै २०२४ रोजी येत आहे. ही अमावस्या राशीचक्रातील काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. दर्श अमावस्या या राशींना विविध प्रकारचे लाभ मिळवून देईल. या अमावस्येचा शुभ लाभ मिळणाऱ्या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया.

मिथुन

यंदाची अमावस्या मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. याकाळात तुमच्या प्रगतीचा वेग वाढेल. अनेक मार्गाने तुमची प्रगती घडून येईल. कमाईचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. उत्पन्नात वाढ होईल. या राशीच्या लोकांवर जर शनीदेवाच्या साडेसातीचा किंवा ढैय्याचा अशुभ प्रभाव असेल, तर तो कमी होण्यास मदत होईल. तुमच्या मनावरचा ताण नाहीसा होईल. नव्या लोकांशी गाठीभेटी होतील. त्यातूनसुद्धा तुम्हाला लाभच होईल. घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहील.

मकर

दर्श अमावस्या मकर राशीच्या लोकांसाठी अनेक बाबींमधून खास असणार आहे. याकाळात तयार झालेल्या शश योगाचा लाभ मकर राशीला मिळणार आहे. त्यामुळे मकर राशीला दुहेरी फायदा होणार आहे. याकाळात कोणताही अशुभ प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. शिवाय आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. उत्पन्नात वाढ झाल्याने आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध सुधारतील. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होऊन एकमेकांबद्दल अधिक ओढ निर्माण होईल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना दर्श  अमावस्येचा लाभ मिळणार आहे. हा काळ या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. याकाळात तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. अडलेली कामे अचानक पूर्ण होतील. कष्ट करूनसुद्धा अपयश मिळत असलेल्या गोष्टींमध्ये याकाळात यश पदरी पडेल. त्यामुळे मन आनंदी आणि उत्साही राहील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मनोरंजक गोष्टी करण्यात वेळ घालवाल. यातून नातेसंबंध अधिक घट्ट होतील.

WhatsApp channel