(2 / 12)मेषः आज नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. परदेशगमनाचे योग येतील. घरामध्ये अचानक उद्भभवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. नोकरीत बदल करायची इच्छा असणाऱ्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. संततीची उज्ज्वल भविष्या कडे वाटचाल रहिल. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभणार आहे. शुभरंग: नारंगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०४, ०८.