(2 / 13)मेषः आज चंद्र शुभ स्थानातून भ्रमण करत असल्याने तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. तुमच्या बुद्धी मत्तेवर वरिष्ठ खूष होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खूष होऊन जाईल. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात यश मिळेल. शुभरंग: नारंगी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०४, ०९.