Today Horoscope 29 August 2024 : आज सिद्धी योग आणि बव करण असून, आज श्रावण एकादशी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा गुरुवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज मतभेद होऊ शकतात. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. वेळेचा अपव्यय टाळा. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील.
वृषभ:
आज हितशत्रुचा त्रास जाणवेल. मनोधैर्य सांभाळा. कामाची गती मंदावेल. निष्काळजीपणा राहील. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी.
मिथुनः
आज कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक फायदा होईल. शुभ कार्यात सहभागी व्हाल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.
कर्क:
आज कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. खूप स्वप्ने रंगवली असतील, त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज निश्चितच लाभ होणार असून, आर्थिक आवक वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी.
सिंह:
आज व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रिय जनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे.
कन्याः
आज आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. इच्छित नोकरी मिळेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत.
तूळ:
आज आत्मविश्वास द्विगुणित होईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. इच्छित फळ मिळणार आहे. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल.
वृश्चिकः
आज प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. महत्वपूर्ण कागदपत्रे सांभाळा. शुभ कार्यासाठी दिवस उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहील.
धनुः
आज नोकरी व्यवसायाचे वातावरण लाभेल. तुमचा आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदार बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल.
मकरः
आज योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. कला क्षेत्रात वाव मिळेल, आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील. व्यवसायातही काहीसा ताणतणाव राहील. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल.
कुंभः
आज स्थावर इस्टेटीचे प्रश्न रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. कटकटी निर्माण करणारे योग आहेत. व्यवसायिकांनाही आर्थिक फसवणुकीचे योग आहेत. व्यवहार काळजीपूर्वक करा. विनाकारण वाद घालू नयेत. कलह होण्याची शक्यता राहील. लक्ष्मीची अवकृपा राहील. काळजीपूर्वक व्यवहार करा.