मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today : सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा, तुम्हाला आजचा दिवस कसा जाईल ! वाचा राशीभविष्य

Horoscope Today : सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा, तुम्हाला आजचा दिवस कसा जाईल ! वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 29, 2024 09:48 AM IST

Horoscope 29 April 2024 : आज २९ एप्रिल २०२४ सोमवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.

राशीभविष्य २९ एप्रिल २०२४
राशीभविष्य २९ एप्रिल २०२४

आज २९ एप्रिल २०२४ सोमवार रोजी, आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

मेष: 

आज आर्थिक बाबतीत आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन, बढती, पदोन्नतीचे योग आहे. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास लाभदायक ठरेल. नवीन कार्य आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे. मनस्वास्थ उत्तम राहील. भाग्यकारक घटना घडतील.

वृषभ: 

आज संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. व्यापारात तुमच्या हुशार व्यक्तिमत्वाचे दर्शन घडेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.

मिथुन: 

आज प्रकृतीची विशेष काळजी लागेल. संताप आणि चिडचिड निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण करावं लागण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्या. नोकरी व्यापारात परस्पर सहकार्याची भावना ठेवा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहील. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटुंबापासुन दूर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. 

कर्क: 

आज तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्त्रोत वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात मंगल कार्य घडतील. 

सिंह: 

आज मनातील संयशावृती वाढेल. कडक बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा.

कन्या: 

आज आर्थिक लाभ होईल. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. घरात आणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. आज यश निश्चित लाभेल. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल.

तूळ: 

आज टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. कर्ज मंजूर होईल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. मनोबल वाढवणारा दिवस राहील. आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील.

वृश्चिक: 

आज आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठमंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या.

धनुः 

आज दिवस प्रगतीकारक आहे. नवीन घर वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. मनात उर्जा आणि सकारात्मकता वाढेल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक सहकार्य लाभेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. 

मकर: 

आज आपला आत्मविशास वाढेल. काही आडाखे निश्चित बांधाल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील. 

कुंभ: 

आज प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी होईल. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. कौटुंबिक जिवन आनंदी राहील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल. आजचा दिवस यशदायक आहे. मानधनात वाढ होईल. 

मीन: 

आज नोकरीत थोडा दूरदर्शीपणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कधीकधी एखादा निर्णय घेण्याबाबत तुमच्याकडून अविचारही होऊ शकतो. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. मनस्वास्थ सांभाळा. मन स्थिर ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही, याबाबत काळजी घ्यावी लागेल. 

WhatsApp channel