Today Horoscope 28 August 2024 : आज वज्र योग आणि वणिज करण असून, आज श्रावण दशमी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा बुधवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज आकस्मिक आर्थिक लाभ होतील. मनस्वास्थ उत्तम राहील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. नशिबाची साथ चांगली मिळेल. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे.
वृषभ:
आज दिवस उत्तम राहील. आत्मविशास वाढेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. आनंददायी वातावरण राहील. नवीन घर वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल.
मिथुनः
आज काम करण्याचा उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस शुभ राहील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. यश मिळेल.
कर्क:
आज आनंदी राहाल. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. कोर्टकचेरीची प्रकरण असतील तर निकाल आपल्या बाजूने लागेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल. आजचे दिनमान सफलतादायक आहे.
सिंह:
आज कामाची पद्धत अवलंबवावी लागेल. कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. मनस्वास्थ सांभाळा. मन स्थिर ठेवा. दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही.
कन्याः
आज प्रगतीकारक दिवस आहे. मनात उर्जा आणि सकारात्मना वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आनंददायक राहील. धनवृद्धी होईल.
तूळ:
आज आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. कामानिमित्त परदेश गमनाच्या संधी मिळतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिवस असेल. संततीकडून सुख समाधान लाभेल.
वृश्चिक:
आज कलह उत्पन्न होणारा योग आहे. खर्चावर नियंत्रण करावं लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. रागावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक गोष्टींना तोंड द्या. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये.
धनु:
आज आनंदी दिवस आहे. कामाचा दर्जा वाढेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक स्त्रोत वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.
मकर:
आज शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. मनातील संयशावृती वाढेल. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. मुलांच्या भन्नाट कल्पनांमुळे चक्रावून जाल, भावनेवर नियंत्रण ठेवा. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो.
कुंभ:
आज आर्थिक लाभ होईल. उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. बौद्धीक गोष्टींकडे ओढ राहील. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल, फायदा होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. सहकार्य लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. पदप्राप्ती मानसन्मान वाढेल.
मीन:
आज अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्याल. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठमंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या.