पैश्याशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. त्यामुळे धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्तीसाठी करिअर, नोकरी अत्यंत महत्वाची बाब आहे. अनेक लोक रात्रंदिवस जॉब शोधण्यासाठी भटकत असतात. काहींना अतिशय सहजासहजी पहिल्याच प्रयत्नांत यश पदरात पडते. मात्र काही लोक असे असतात ज्यांना सतत कष्ट करुन, क्षमता असूनसुद्धा जॉब मिळवण्यात अपयश येते. अशावेळी हे लोक खचून जातात. त्यांच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडू लागतो. मात्र यामध्ये जोतिषशास्त्राचासुद्धा संबंध असण्याची शक्यता असते.
बहुतांश लोकांच्या बाबतीत असे दिसून येते की, त्यांच्याकडे क्षमता असूनदेखील करिअरमध्ये चांगलं काही घडत नाही. अनेकांचा इंटरव्यू चांगला होतो. परंतु ऑफर लेटर हातात येत नाही. यामध्ये तुमच्या क्षमतेचा नव्हे तर ग्रहांचा दोष असू शकतो. कोणत्याही गोष्टीत माणसाची जिद्द, कष्ट आणि प्रयत्न आवश्यक असतात. मात्र बऱ्याच वेळा हे सर्व करुनदेखील काहीच साध्य होत नाही. अशावेळी ग्रहदोषामुळे तुम्हाला त्रास जाणवत असतो.
जर तुमच्यासोबतसुद्धा अशा गोष्टी घडत असतील. तुम्हालाही जॉब मिळवण्यात सतत अपयश येत असेल, अडचणी येत असतील. तर त्यासाठी जोतिषशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. शास्त्रानुसार रविवारच्या दिवशी हा ग्रहदोषासंबंधी उपाय केल्याने लाभ मिळतो. नोकरीत अडचणी येत असतील तर लोकांच्या कुंडलीत सूर्य ग्रह कमजोर असतो. सूर्य ग्रह मजबूत केल्याने या अडचणी दूर होण्यास मदत मिळते.
तुमच्याही नोकरीसंबंधी कामात ग्रहदोष असेल तर तो दूर करण्यासाठी रविवारी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठा.
रविवारच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करा. ब्रह्म मुहुर्तात सूर्य देवाला जल अर्पण करणे अत्यंत शुभ समजले जाते. त्यामुळे सकारात्मक प्रभाव आयुष्यावर पडतो.
रविवारच्या दिवशी सूर्य देवाला जल अर्पण करताना '' ॐ वासुदेवाय नमः'' या मंत्राचा जप करा.
तसेच रविवारच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्रचा पाठ आवश्यक करा.
जोतिष शास्त्रानुसार रविवारच्या दिवशी सूर्य देवाची उपासना केल्याने नोकरीसंबंधी येत असलेल्या अडचणी दूर होतात.
नोकरीत असलेला ग्रहदोष दूर करण्यासाठी पहाटे लवकर उठून माशांना कणकाचे गोळे खाऊ घालावे.
रविवारच्या दिवशी काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे. त्यामुळे सूर्याची स्थिती कमजोर होऊ शकते.
रविवारच्या दिवशी सूर्याची उपासना केल्यास सूर्य ग्रह मजबूत होऊन नोकरीसंबंधी लाभ मिळण्यास सुरुवात होते.
संबंधित बातम्या