हिंदू पंचांगानुसार आज देवशयनी एकादशीसोबतच चातुर्मास प्रारंभ होत आहे. दरम्यान शास्त्रानुसार भगवान विष्णू तब्बल चार महिने निद्रा घेतील. याकाळात भगवान शिव या ब्रह्माण्डाचा कार्यकाल सांभाळतील. ज्योतिष अभ्यासानुसार आजपासून पुढील चार महिने शुभ कार्य आणि मांगलिक कार्य थांबवण्यात येतील. दरम्यान याकाळात अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जात आपल्या स्थानात बदल करतील. ग्रहांच्या या गोचरमधून अनेक राजयोग जुळून येणार आहेत. या राजयोगांचा फायदा बारा राशींपैकी काही राशींना होणार आहे. या नशीबवान राशी कोणत्या आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
आज १७ जुलै २०२४ रोजी आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. त्यालाच आपण 'आषाढी एकादशी' असे संबोधतो. हिंदू धर्मात या सणाला प्रचंड महत्व आहे. विशेष करून वारकरी समाजासाठी हा सोहळा अत्यंत प्रिय आहे. दरम्यान आज चातुर्मासाला प्रारंभ होत आहे. चातुर्मासातसुद्धा लाभ मिळणाऱ्या नशीबवान राशी कोणत्या आहेत? ते आपण जाणून घेऊया.
चातुर्मासात मिथुन राशीच्या लोकांना प्रचंड लाभ मिळणार आहे. याकाळात तुमच्यावर भगवान विष्णूसोबतच भगवान शिवची शुभ कृपादृष्टी राहणार आहे. या चार महिन्यांमध्ये तुमच्या आयुष्यात अनेक सुखद गोष्टी घडतील. आयुष्यात सुखसमृद्धी नांदेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. हातात घेतलेली महत्वाचे कामे विनाअडथळा पार पडतील. आयुष्यात प्रगती करण्याचा नवा मार्ग सापडेल. मिळकतीचे विविध मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा प्रचंड मजबूत होईल. करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल.
चातुर्मासात कुंभ राशीच्या लोकांना प्रचंड लाभ मिळणार आहे. याकाळात तुम्हाला भगवान विष्णू, भगवान शिवसोबतच, शनिदेवाचा आशीर्वादसुद्धा लाभणार आहे. याकाळात केलेल्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या समस्या याकाळात दूर होतील. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचा योग आहे. तुमच्या विविध अडचणी दूर होतील. मनावरचा ताण दूर होऊन मानसिक स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात प्रचंड लाभ मिळाले. व्यवसाय विस्तारेल. कमाईचे नवे मार्ग सापडतील. त्यामुळे धनसंपत्तीत विशेष वाढ होईल.
मिथुन आणि कुंभप्रमाणेच कन्या राशीच्या लोकांनासुद्धा चातुर्मासात लाभ मिळणार आहे. याकाळात भगवान विष्णू आणि भगवान शिवच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. विविध क्षेत्रातील लोकांना विविध लाभ झालेले दिसून येतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यातून मतभेद दूर होऊन नात्यात गोडवा निर्माण होईल. विविध मार्गाने अनपेक्षितपणे धनलाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. घरात सुखसुविधांमध्ये प्रचंड वाढ होईल. नोकरी बदलण्याचा विचार असणाऱ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरीची ऑफर मिळेल.