ज्योतिष शास्त्रानुसार अवकाशात होणाऱ्या खगोलीय गोष्टींचा संबंध मानवी आयुष्याशीदेखील असतो. या खगोलीय हालचालींना ज्योतिषीय महत्वदेखील प्राप्त आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींवरुन ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला जातो. ग्रहांच्या हालचालींमधून जे बदल घडून येतात, त्यावरूनच राशींचे भविष्य ठरत असते. त्यामुळेच राशीभविष्यात ग्रहांना एक विशिष्ट महत्व प्राप्त आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका ठराविक वेळेत आपले राशी परिवर्तन करत असतात. यामध्ये ग्रह एका राशीतून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. यालाच गोचर असे म्हटले जाते.
दरम्यान येत्या ऑगस्ट महिन्यात अनेक मोठे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करणार आहेत. या गोचरमधून अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत. या योगांचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम राशींवर पडत असतो. ऑगस्टमध्ये व्यापार दाता बुध आणि ग्रहांचा राजा सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. त्यासोबतच धन दाता शुक्र आणि चंद्रसुद्धा याच राशीत विराजमान असणार आहेत. अशा स्थितीत चारही मोठे ग्रह एकत्र आल्याने 'चतुर्ग्रही योग' जुळून येणार आहे. या योगाचा काही राशींवर अत्यंत शुभ प्रभाव पडणार आहे. त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
ऑगस्टमध्ये जुळून येणाऱ्या चतुर्ग्रही योगाचा शुभ लाभ सिंह राशीच्या लोकांना होणार आहे. चंद्र, सूर्य, बुध आणि शुक्र याच राशीमध्ये हा योग निर्माण करत असल्याने या राशीला दुहेरी फायदा मिळेल. याकाळात तुमच्या व्यक्तिमत्वात प्रचंड सुधारणा होईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची महत्वाची कामे विनाअडथळा पूर्ण होतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये प्रगती होईल. नोकरी बदलाचा विचार असेल तर ते स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत बढती आणि पगारवाढ मिळण्याचा योग आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील.
चतुर्ग्रही योगाचा फायदा धनु राशीच्या लोकांना होणार आहे. कारण हा योग या राशीच्या नवव्या घरात तयार होणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यामुळे हातातील सर्वच कार्यांना यश मिळेल. तुम्ही कार्यक्षेत्रात लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या कामावर वरिष्ठ प्रभावित होतील. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग जुळून येईल. शिवाय तुमच्या कलाकौशल्यात आणि बौद्धिक क्षमतेत प्रचंड वाढ होईल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. मन प्रसन्न राहील.
चार ग्रहांच्या संयोगातून निर्माण झालेला चतुर्ग्रही योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. या राशीच्या कर्म घरात हा योग जुळून येत आहे. याकाळात उद्योग-व्यवसायात विविध आर्थिक लाभ होतील. पैसे कमाविण्याचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. अचानक धनलाभ होईल. मुबलक धन हातात आल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. व्यापार विस्तार करण्यात याकाळात यश येईल. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे.
संबंधित बातम्या