जोतिष शास्त्रामध्ये ग्रह, नक्षत्र, राशींना प्रचंड महत्व आहे. शास्त्रानुसार ग्रह-नक्षत्र एका ठराविक काळानंतर राशीपरिवर्तन करुन त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग निर्माण करत असतात. मान्यतेनुसार, याचा परिणाम मानवी आयुष्यावरदेखील होत असतो. येत्या काही दिवसांत असाच एक राजयोग जुळून येणार आहे.
३१ मे २०२४ रोजी ग्रहांचा राजा बुध वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र याआधीच त्या राशीत सूर्य, शुक्र आणि गुरु असे प्रभावी ग्रह विराजमान आहेत. अशातच या ग्रहांच्या एकत्र येण्याने चतुर्ग्रही योग घटित होत आहे. जोतिष अभ्यासानुसार तब्बल १०० वर्षांनी हा दुर्मिळ योग जुळून येत आहे. हा योग राशीचक्रातील काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. पाहूया या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
बुध, गुरु, शुक्र आणि सूर्याच्या चतुर्ग्रही योगाचा विशेष फायदा मेष राशीला होणार आहे. शास्त्रानुसार,वाणी या भावावर मेष राशीसाठी हा योग तयार होत असल्याने अचानक धनलाभाचे योग येतील. त्यामुळे आयुष्यात आर्थिक स्थैर्य येईल. तुमच्या कार्यामुळे तुम्हाला समाजात प्रचंड मानसन्मान लाभेल. अनेक दिवसांपासून एखाद्या ठिकाणी अडकून असले पैसे याकाळात परत मिळतील. त्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. अनपेक्षित मार्गाने धन मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतील. अचानक तुमच्या बोलण्यात प्रचंड सकारत्मक बदल होईल. त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जोडीदारासोबत मतभेद दूर होऊन एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम वाढीस लागेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध, सूर्य, शुक्र, गुरु यांचा चतुर्ग्रही योग लाभदायक ठरणार आहे. या चतुर्ग्रही योगाने वृषभ राशीच्या लोकांचा चांगला काळ सुरु होणार आहे. याकाळात वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाला समाजात एक नवी प्रभावी ओळख मिळेल. नोकरदार वर्गाला अगदी कमी वेळेत चांगले यश पदरी पडेल. त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. विवाहित लोकांना उत्तम गृहसौख्य लाभणार आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. मनाप्रमाणे गोष्टी घडत असल्याने तुमची मानसिक स्थितीसुद्धा चांगली राहणार आहे.
मेष आणि वृषभ राशीप्रमाणेच कर्क राशीलासुद्धा १०० वर्षानंतर जुळून येणाऱ्या चतुर्ग्रही योगाचा फायदा होणार आहे. या योगामुळे कर्क राशीच्या लोकांचे नशीब पालटणार आहे. याच्या सकारत्मक प्रभावाने तुमच्या पगारात वाढ होईल. नोकरीमध्ये मोठ्या पदावर बढती मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. याकाळात तुमच्या नव्या योजना सफल होऊन धनवर्षाव होईल. या चतुर्ग्रही योगादरम्यान एखादी आर्थिक गुंतवणूक करणे फायद्याची ठरणार आहे. ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.