मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Chandra Gochar : चंद्र करणार २९ नोव्हेंबरला राशी परिवर्तन, 'या' चार राशींचे सुखाचे दिवस येणार

Chandra Gochar : चंद्र करणार २९ नोव्हेंबरला राशी परिवर्तन, 'या' चार राशींचे सुखाचे दिवस येणार

HT Marathi Desk HT Marathi
Nov 27, 2023 07:10 PM IST

Chandra Grah Rashi Parivartan news in marathi : मनाचा कारक असलेला चंद्र ग्रह २९ नोव्हेंबरला राशी परिवर्तन करतोय. त्याचा चार राशींना विशेष लाभ होणार आहे.

Chandra Gochar
Chandra Gochar

Chandra gochar : चंद्र हा शांत शीतल प्रकृतीचा, सर्वांना हवाहवासा वाटणारा ग्रह आहे. त्यामुळंच की काय त्याच्यावर कविताही केल्या जातात. सौंदर्याची तुलना करताना ती थेट चंद्राशीच केली जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये देखील चंद्राला विशेष महत्त्व आहे. तो मनाचा कारक मानला जातो. 

कुंडलीत चंद्र कमजोर असल्यास व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि चंद्राच्या उच्च स्थानामुळं व्यक्तीला समाजात खूप मानसन्मान मिळतो. करिअरमध्ये अपार यश मिळतं. मन शांत आणि आनंदी राहतं, असं मानलं जातं.

चंद्र हा ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतो. येत्या २९ नोव्हेंबर रोजी चंद्र वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे आणि १ डिसेंबरला लगेचच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या या वेगवान राशी बदलाचा चार राशींना मोठा लाभ होणार आहे. जाणून घेऊया या नशीबवान राशींबद्दल...

gochar : डिसेंबरमध्ये ५ मोठे ग्रह करणार राशी परिवर्तन, 'या' राशींचं भाग्य पालटणार

वृषभ

चंद्राचं विशेष पाठबळ वृषभ राशीच्या जातकांना लाभणार आहे. चंद्राच्या राशी परिवर्तनामुळं व त्याच्या शुभ प्रभावामुळे तणाव हलका होईल. मनात नकारात्मक विचार पळून जातील. सुखसमृद्धी वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. पती-पत्नीमधील संबंध अधिक दृढ होतील. प्रेमप्रकरणात असाल तर प्रेमसंबंध घट्ट होतील.

कर्क

कर्क राशीला चंद्राच्या राशी बदलाचा लाभ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचा योग आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील. त्यामुळं कामात उत्साह वाटेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात आर्थिक लाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीनं अभ्यास करावा व ज्ञान आत्मसात करावे.

तूळ

चंद्रदेवांच्या कृपेनं तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. गुंतवणुकीतून आर्थिक लाभाचा योग आहे. वारसा हक्काच्या मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. नशीब तुम्हाला साथ देईल. आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील. रखडलेली कामं पूर्ण होतील. तुमचं आरोग्य ठणठणीत राहील.

धनु 

शुभवार्ता कानी पडेल. घरात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण राहील. मन प्रसन्न राहील. ताण जाणवणार नाही. अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. लग्न जमवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात यश येईल. उसने दिलेले पैसे परत मिळतील. संपत्ती वाढेल. व्यवसायात प्रगतीचा योग आहे. एकंदर जीवन आनंदात जगाल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)