ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतात. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. या गोचरचा थेट परिणाम राशीचक्रातील राशींवर पडत असतो. या हालचालींमधून अनेक शुभ-अशुभ योग घडून येत असतात. दरम्यान बहुतांशवेळा एकाच राशीत एक पेक्षा अधिक ग्रह गोचर करतात. अशावेळी ग्रहाची युती पाहायला मिळते. या युतीमुळे अनेक योगसुद्धा जुळून येतात. या योगांचा काही राशींना सकारात्मक तर काही राशींना नकारात्मक परिणाम दिसून येतो. दरम्यान आज चंद्र आणि मंगळची शुभ युती जुळून येत आहे.
आज रविवार ३० जुलै २०२४ रोजी चंद्र मीन राशीनंतर मेष राशीत गोचर करणार आहे. तत्पूर्वी त्याठिकाणी आधीच मंगळ विराजमान आहे. अशात चंद्राचा मंगळशी संयोग होऊन चंद्र मंगळ योग तयार होईल. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची नववी तिथी आहे.शिवाय आज चंद्र-मंगळ योगासोबतच सुकर्मा योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत आहे. त्यामुळे वैदिक शास्त्रानुसार आजचा दिवस अतिशय खास आहे. आज असलेल्या चंद्र-मंगळ योगाचा शुभ लाभ कोणत्या राशींना होणार ते जाणून घेऊया.
मिथुन राशींच्या लोकांना आज चंद्र-मंगळ योगात अचानक धनलाभ होईल. एखाद्या सरकारी योजनेतून धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. आज तुमच्याकडून जमीन किंवा वाहन खरेदी होऊ शकते. तुम्ही तुमच्या कामासोबत नेहमी एकनिष्ठ राहाल. वैवाहिक आयुष्याविषयी सांगायचे झाले तर जोडीदारासोबत असलेले मतभेद आज संपुष्टात येतील. पतिपत्नीच्या नात्यात गोडवा येईल. आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. करिअरमधील सर्व अडथळे याकाळात दूर होतील. तसेच तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे.
कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्र-मंगळ योगात आज रविवराचा दिवस लाभदायक असणार आहे. कन्या राशीचे लोक आज पूर्णपणे सुट्टीचा आनंद घेतील. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखला जाईल. एखाद्या मित्राकडून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. अचानक पैसे मिळाल्याने मन आनंदी होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यापाऱ्यांना आज मोठा आर्थिक फायदा होईल. व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. प्रत्येक कामात यश मिळेल. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रेमीयुगल एकमेकांसोबत भविष्याच्यादृष्टीने संवाद साधतील.
चंद्र-मंगळ शुभ संयोगाचा लाभ वृश्चिक राशीलासुद्धा मिळणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट घ्याल. या शुभ संयोगात तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला लगेच मिळेल.
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना मनासारखे यश मिळेल. तुमच्या कामासाठी तुम्हाला पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना चांगला आर्थिक लाभ होईल. शिवाय एखाद्या नव्या व्यवसायात पैशांची गुंतवणूक कराल. कामानिमित्त विदेश यात्रा घडून येईल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
संबंधित बातम्या