वैदिक शास्त्रानुसार राशीभविष्याला विशेष महत्व आहे. बहुतांश लोक दैनंदिन राशीभविष्य पाहून आपल्या दिवसाची सुरुवात करतात. परंतु तुम्हाला माहितेय का? ग्रहांच्या हालचालींवरुन राशींचे भविष्य ठरत असते. ग्रह एका ठराविक काळानंतर आपले स्थान बदलत असतात. यामध्य्ये ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर अर्थातच संक्रमण करत असतात. नऊ ग्रहांच्या या गोचरमधून विविध शुभ-अशुभ योग घडून येत असतात. या योगांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर पडत असतो. अशाप्रकारे राशींचे भविष्य निश्चित होते.
दरम्यान चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. चंद्राच्या या भ्रमणातून आज वृद्धी योग निर्माण होत आहे. या शुभ योगाचा विशेष फायदा काही राशींना मिळणार आहे. शिवाय आज गजकेसरी योग, मृगशिरा नक्षत्र यांचासुद्धा शुभ संयोग घडून येत आहे. शिवाय आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थदशी तिथीसुद्धा आहे. या सर्व शुभ संयोगात कोणत्या राशींना विशेष लाभ होणार? आणि वृद्धी योगात कोणत्या राशी नशीबवान ठरणार ते जाणून घेऊया.
चंद्रभ्रमणातून निर्माण झालेल्या वृद्धी योगाचा लाभ मेष राशीलासुद्धा मिळणार आहे. याकाळात तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. कमाईचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. वैवाहिक लोकांच्या आयुष्यातील मतभेद दूर होऊन सुखसमृद्धी येईल. एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असेल तर हा दिवस उत्तम आहे. आज तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक केल्यास चांगला आर्थिक लाभ दिसून येईल. नोकरदारवर्गाला एखाद्या मोठ्या कंपनीतून नोकरीची ऑफर मिळू शकते.
कर्क राशीच्या लोकांसाठी आज वृद्धी योग अतिशय खास ठरणार आहे. आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ होईल. घरात भौतिक सुख देणाऱ्या वस्तूंची खरेदी होईल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. शिवाय वरिष्ठांकडून तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. मुलांकडून एखादी खुशखबर मिळण्याचा योग आहे. अविवाहित लोकांना आज तुमचा जोडीदार मिळण्याची दाट शक्यता आहे.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा वृद्धी योग फलदायी ठरणार आहे. वृद्धी योगात तुमच्या प्रतिष्ठित लोकांशी गाठीभेटी होतील. त्यातून तुमची समाजातील पदप्रतिष्ठा वाढेल. तुमचे व्यक्तिमत्व खुलण्यास मदत होईल. विविध मार्गाने आर्थिक फायदा होईल. अनेक दिवसांपासून अडलेले पैसे तुम्हाला आज परत मिळतील. अचानक धनलाभ झाल्याने मन उत्साही आणि आनंदी राहील. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. भविष्याच्या दृष्टीने एखादी मोठी डील पदरात पडेल.
आज निर्माण झालेल्या वृद्धी योगाचा विशेष लाभ मकर राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. या योगात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. मनात असलेल्या सर्व इच्छा आज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आज नोकरी मिळण्याचा योग आहे. एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास त्यातून चांगला आर्थिक फायदा होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणाला भेट द्याल. त्यातून मन प्रसन्न होईल.
संबंधित बातम्या