वैदिक शास्त्रामध्ये राशीभविष्याला विशेष महत्व आहे. राशीचक्रात एकूण १२ राशी असतात. या राशी ग्रह-नक्षत्रांच्या आधारे कार्यरत असतात. ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलाने या राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतात. त्यालाच अशुभ योग आणि अशुभ योग संबोधले जाते. ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर (संक्रमण) करत असतात. प्रत्येक ग्रहाच्या गोचरचा कालावधी कमी-जास्त असतो. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा अनेक महत्वाचे योग जुळून येतात. शास्त्रानुसार हे योग अत्यंत महत्वाचे असतात. कारण या योगांच्या आधारे राशींच्या भविष्याचा अंदाज बांधला जातो.
ज्योतिषशास्त्रात नवग्रहांना प्रचंड महत्व आहे. या प्रत्येक ग्रहाचे एक वेगळे वैशिष्ट्य आणि गुणधर्म असते. त्या गुणधर्मानुसार युती किंवा योग घटित होत असतात. दरम्यान चंद्र लवकरच आपली राशी परिवर्तन करणार आहे. येत्या २६ जून रोजी चंद्र कुंभ राशीत गोचर करणार आहे. परंतु तत्पूर्वी शनिदेव कुंभ राशीत आधीच विराजमान आहेत. चंद्राच्या गोचरने कुंभ राशीत चंद्र आणि शनि संयोग निर्माण होणार आहे. या संयोगाने अत्यंत शुभ समजला जाणारा 'शशि योग' जुळून येत आहे. या राजयोगाने १२ राशींपैकी काही राशींना प्रचंड लाभ मिळणार आहे. त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया.
चंद्र-शनि संयोगाने निर्माण होणाऱ्या शशि योगाचा विशेष फायदा मिथुन राशीच्या लोकांना मिळणार आहे. याकाळात तुमच्या आयुष्यात सुखसमृध्दीची नांदी होईल. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. कार्यक्षेत्रात असणाऱ्या शत्रूंचे डाव तुम्ही उलटून लावण्यात यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याकाळात घवघवीत यश मिळेल. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांना गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळतील. स्वतःच्या आणि जोडीदाराच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
चंद्र आणि शनिच्या संयोगाने निर्माण होणाऱ्या शशि राजयोगाचा लाभ धनु राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. याकाळात रखडलेली कामे मार्गी लागतील. घरातील भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. त्यामुळे कुटुंबातील वातावरण अगदी खेळीमेळीचे असेल. उद्योग-व्यवसायात नव्या संधी प्राप्त होतील. अनपेक्षितपणे धनलाभ होण्याचा योग जुळून येईल. आलेल्या पैशातून आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. नोकदारवर्गाला नोकरीत बढतीचे योग आहेत. कमी वेळेत जास्त प्रगती झालेली दिसून येईल. मुले आणि पत्नीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवाल. शिवाय एखाद्या छोट्याशा ट्रिपचेसुद्धा नियोजन कराल. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे.
मिथुन आणि धनु राशींप्रमाणेच मकर राशीलासुद्धा शशि राजयोगाचा लाभ मिळणार आहे. याकाळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. त्यातून समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात तुमचा नावलौकिक वाढेल. वरिष्ठांकडून एखादी मोठी जबाबदारी पदरात पडण्याची शक्यता आहे. शिवाय धनलाभ होण्याचा योग जुळून येत आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर फेरफटका माराल. त्यांच्याशी मनमोकळा संवाद होऊन नात्यात गोडवा निर्माण होईल. घरातील वातावरण आनंदी राहील.
इतर तिन्ही राशीप्रमाणेच कुंभ राशीसुद्धा चंद्र आणि शनिदेवाच्या संयोगाने प्रभावित असणार आहे. या राशीच्या लोकांनासुद्धा शशि राजयोगाचा फायदा मिळणार आहे. याकाळात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. आयुष्यात एक सकारात्मक बदल जाणवेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. विविध मार्गाने धनलाभ होईल. हातात पुरेसा पैसा आल्याने समाधान लाभेल. विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांना विवाह जुळण्याचा योग आहे. त्यामुळे घरात शुभ कार्य घडून येईल. तुमचे मन आणि घरातील वातावरण दोन्ही अगदी प्रसन्न असणार आहेत.
संबंधित बातम्या