Chandra Gochar: चंद्र सतत एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करत असतो. नवग्रहांमध्ये केवळ चंद्रच असा ग्रह आहे जो गोचरसाठी सर्वात कमी कालावधी घेतो. त्यामुळेच चंद्राच्या भ्रमणातून दररोज कोणते ना कोणते शुभ-अशुभ योग घडून येत असतात. आज शुक्रवार १२ जुलै २०२४ रोजी चंद्र बुध ग्रहाची राशी असणाऱ्या कन्या राशीत गोचर करत आहे. या गोचरमधून आज शिव योग, रवि योग आणि उत्तराफाल्गुनी नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. शिवाय आज आषाढ मासातील शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी आहे. त्यामुळे आजचा दिवस ज्योतिषीय अभ्यासानुसार बराच खास आहे.
खगोलशास्त्रानुसार अवकाशात तब्बल ९ ग्रह कार्यरत आहेत. या ग्रहांच्या हालचाली खगोलीय असल्या तरी, ग्रहांच्या या हालचालींना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे. ग्रह-नक्षत्रांचा थेट संबंध मानवी आयुष्याशी जोडला जातो. या शास्त्रानुसार ग्रहांच्या स्थान बदलातून होणाऱ्या हालचालींचा प्रभाव राशींवर पडतो. आणि त्यातूनच राशींचे भविष्य ठरते. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात या क्रियेलाचा 'गोचर' असे म्हणतात. ग्रहांच्या या गोचरमधून अनेक शुभ-अशुभ योगांची निर्मिती होते. हे योग राशींना सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम देत असतात. आज चंद्राच्या गोचरचा सकारात्मक परिणाम कोणत्या राशींवर पडणार आहे ते जाणून घेऊया.
आजच्या शिव योग आणि रवि योगाचा शुभ लाभ मेष राशीच्या लोकांना मिळणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. शिवाय देवी लक्ष्मी आणि महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आज पूर्ण होणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला आज मिळेल. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरदार वर्गाच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. व्यापाऱ्यांना आज चांगला आर्थिक फायदा होईल. अनेक दिवसांपासून एखाद्या आजाराने त्रस्त असणाऱ्यांना आज आराम मिळेल. आजार दूर होऊन चांगले आरोग्य लाभेल.
शिव योग आणि रवि योगाचा आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. आज तुमची प्रत्येक क्षेत्रात प्रगती दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ मिळाल्याने आज ध्येय प्राप्ती होईल. उद्योग-व्यवसायात मोठा आर्थिक नफा होईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी योजना आखाल. घरात एखादे शुभ कार्य घडून येईल. त्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहील. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. त्यातून मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या संवाद कौशल्याने लोक प्रभावित होतील. तुमच्या बुद्धी चातुर्यामुळे लोक तुमच्याकडून सल्ला घेतील.
आजच्या शुभ योगात मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी ठरणार आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेले कामे आज पूर्ण होतील. व्यवसायात नव्या योजना आखाल. त्याचा फायदा भविष्यात होईल. अचानक आर्थिक धनलाभ होतील. खिशात पैसे आल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरदार वर्गाला पदोन्नती किंवा पगारवाढचा योग आहे. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी येईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
संबंधित बातम्या