मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Shashi Raj Yog : शशी राजयोग करणार मालामाल! 'या' राशींचे नशीब सोन्यासारखे झळाळणार

Shashi Raj Yog : शशी राजयोग करणार मालामाल! 'या' राशींचे नशीब सोन्यासारखे झळाळणार

Jul 02, 2024 09:58 AM IST

Chandra Gochar : ग्रहांच्या गोचरमुळे अनेक योग-राजयोग निर्माण होतात. हे योग काही राशींसाठी फायद्याचे तर काहींसाठी नुकसानीचे ठरतात.

शशी राजयोग २ जुलै २०२४
शशी राजयोग २ जुलै २०२४

वैदिक शास्त्रानुसार तब्बल ९ ग्रह कार्यरत असतात. या नवग्रहांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे. कारण ग्रहांच्या हालचालींवरुन राशींचे भविष्य ठरत असते. ग्रह एका ठराविक कालावधीनंतर आपले स्थान बदलत असतात. ग्रह आपले स्थान बदलत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, यालाच गोचर किंवा संक्रमण असे म्हणतात. ग्रहांच्या गोचरमुळे अनेक योग-राजयोग निर्माण होतात. हे योग काही राशींसाठी फायद्याचे तर काहींसाठी नुकसानीचे ठरतात. दरम्यान आज मंगळवारच्या दिवशी चंद्र कृतिका नक्षत्रातून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या या गोचरमधून आज शशी राजयोग जुळून येत आहे. शशी राजयोगाचा विशेष लाभ काही राशींना मिळणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी शशी राजयोगात आज मंगळवारचा दिवस चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड निर्माण होईल. या राजयोगात तुमच्या व्यवसायाला नवी गती मिळेल. ज्यामुळे आर्थिक लाभाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. हातात पैसे आल्याने तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. मित्रांसोबत दिवस मजेत जाईल. गप्पागोष्टी रंगतील.

सिंह

सिंह राशींच्या लोकांना शशी राजयोगाचा उत्तम लाभ मिळणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कार्यक्षेत्रात रखडलेली कामे मार्गी लागतील. उद्योग-व्यवसायात नवीन काम पदरी पडेल. त्यातून आर्थिक फायदा होईल. व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात नवनवीन संधी मिळतील. आपल्या कला सादर करण्यासाठी चांगले व्यासपीठ प्राप्त होईल. विवाहित पुरुषांना सासरवाडीकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. जवळच्या व्यक्तीसोबत असलेले मतभेद याकाळात संपुष्ठात येतील. एकंदरीत शशी राजयोग सिंह राशीसाठी फलदायी ठरणार आहे.

कन्या

कन्या राशीसाठी शशी राजयोग लाभदायक ठरणार आहे. आज दिवसभर उत्साह जाणवेल. प्रत्येक कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल. अडलेली कामे आज अचानकपणे पूर्णत्वास जातील. याकाळात मनावरील ताण कमी होईल. मुलाच्या विवाहासाठी चांगले प्रस्ताव येतील. नोकरदारवर्गाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. करिअरचा आलेख उंचावेल. तुमची वेगाने प्रगती होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनपेक्षित मार्गाने आर्थिक लाभ होईल. घरात महागड्या वस्तूंची खरेदी कराल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी शशी राजयोगाचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक प्रभावशाली लोकांच्या संपर्कात येण्याची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा वावर वाढेल. घरामध्ये आज एखादे धार्मिक कार्य होऊ शकते. त्यामुळे घरात घाई गडबड दिसून येईल. या योगात विरोधकांचे डाव उधळून लावण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इतरांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल.

WhatsApp channel