मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Astrology : आज जुळून येतोय सर्वार्थ सिद्धी योग! 'या' चार राशींची आर्थिक चणचण संपणार, होणार पैशांचा पाऊस

Astrology : आज जुळून येतोय सर्वार्थ सिद्धी योग! 'या' चार राशींची आर्थिक चणचण संपणार, होणार पैशांचा पाऊस

Jul 07, 2024 08:53 AM IST

Benefit Of Sarvarth Siddhi Yog : आज ७ जुलै २०२४ रोजी चंद्रभ्रमणातून सर्वार्थ सिद्धी योगाची निर्मिती होत आहे. हा योग राशीचक्रातील काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरत आहे.

सर्वार्थ सिद्धी योगाचा राशींवर शुभ प्रभाव
सर्वार्थ सिद्धी योगाचा राशींवर शुभ प्रभाव

ज्योतिषशास्त्रारानुसार प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करण्यासाठी एक ठराविक वेळ घेतो. मात्र या सर्वांमध्ये चंद्र भ्रमण करण्यासाठी सर्वात कमी वेळ घेतो. चंद्र एक ते दीड तासात भ्रमण करत असतो. चंद्राच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करण्याने विविध योग जुळून येतात. आज ७ जुलै २०२४ रोजी चंद्रभ्रमणातून सर्वार्थ सिद्धी योगाची निर्मिती होत आहे. हा योग राशीचक्रातील काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरत आहे. सर्वार्थ सिद्धी योगात आज सकारत्मक परिणाम होणाऱ्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

वृषभ

आज सर्वार्थ सिद्धी योगात वृषभ राशीच्या लोकांना फायदा मिळणार आहे. आज या योगात तुम्हाला सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल.व्यवसाय-उद्योगात चांगला नफा होईल. अनपेक्षितपणे धनलाभ होईल. पैसे हातात येऊन आर्थिक स्थिती सुधारेल. शत्रुपक्षाचे डाव उलटून लावण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत विरोधकावर मात कराल. रोजगारात नवनवीन संधी प्राप्त होतील. या योगात आर्थिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.

कन्या

आज सर्वार्थ सिद्धी योगात खरेदी आणि शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. उद्योगधंद्यात नवनवीन प्रयोग यशस्वी ठरतील. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. तरुणाईला प्रेम प्रकरणात यश येईल. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी केल्याने वरिष्ठांकडून कौतुक होईल.

तूळ

सर्वार्थ सिद्धी योगात तूळ राशीच्या लोकांना जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. धनलाभ झाल्याने आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल.

सिंह

आज सर्वार्थ सिद्धी योगात महत्वाच्या कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. या योगात किर्ती आणि प्रसिद्धीचा योग जुळून येत आहे. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात चांगला वाव मिळेल. व्यवसायात आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. त्यांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. याकाळात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल.

WhatsApp channel
विभाग