Mesh Rashi Career : मेष राशीच्या व्यक्तीला नोकरी वा व्यवसायासाठी कोणती क्षेत्र चांगली? जाणून घ्या!-career predictions according to rashi here are the details of mesh rashi career aries rashi career in marathi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Rashi Career : मेष राशीच्या व्यक्तीला नोकरी वा व्यवसायासाठी कोणती क्षेत्र चांगली? जाणून घ्या!

Mesh Rashi Career : मेष राशीच्या व्यक्तीला नोकरी वा व्यवसायासाठी कोणती क्षेत्र चांगली? जाणून घ्या!

HT Marathi Desk HT Marathi
Jan 18, 2024 10:43 AM IST

Mesh Rashi Career Predictions : राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया मेष राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

Mesh Rashi Career
Mesh Rashi Career

Zodiac Signs and Career : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया मेष राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

मेष राशीत येणारी नक्षत्रे

मेष ही राशीचक्रातील पहिली रास समजली जाते. या राशीत केतूचे अश्विनी, शुक्राचे भरणी आणि रविचे कृतिका नक्षत्र येते. राशीचा स्वामी आहे. मंगळ म्हणजे मेष राशीवर केतू, शुक्र, रवि आणि मंगळाचे वर्चस्व आहे. त्यातही अश्विनी हे पूर्ण नक्षत्र, भरणी हे पूर्ण नक्षत्र तर कृतिकाची नक्षत्राचे दोन चरण येतात. राशीस्वामी मंगळ आहे. मंगळ प्रधान व्यक्ती नेतृत्व करणारे असून सैन्यातील अधिकारी, नौदलातील अधिकारी, डिफेन्स विभाग, पोलीस अधिकारी, रसायन शास्त्रात काम करणारे, शस्त्रक्रिया करणारे सर्जन, सुतारकाम करणारे कारागिर, इस्टेट एंजट, मेकॅनिक, फिजिशियन, खेळाडू इत्यादी क्षेत्रात आपलं करिअर घडवणारे असतात.

मेष राशींच्या व्यक्तींचा स्वभाव आणि गुणधर्मः मेष राशीच्या जातकाचे यश स्वयंभू पद्धतीने स्वत:च्या ताकतीवर मिळवलेले असते. वेगवेगळी आव्हाने स्वीकारणे आणि ती यशस्वी करणे यांना आवडते. पण आवडीनिवडीबाबत यांच्या भूमिका ठाम असल्यामुळे बऱ्याचवेळा गैरसमज ओढवून घेतले जातात. या व्यक्ती आक्रमक धार्मिक व गूढ गोष्टींकडे वळणाऱ्या असल्या तरी त्यांची त्यागाची भावना चांगली असते. त्याच्यांत नेतृत्वाचे गुण चांगले असतात. धाडसी असणाऱ्या या व्यक्तींना नेतृत्व गुण किंवा समूहाचा लीडर व्हायला आवडते. तापटपणा व रागीट अशा या व्यक्तींना खोटेपणा सहन होत नाही व जशास तसे उत्तर देण्याची आणि हजरजबाबीपणा हा यांचा गुणधर्म असतो. प्रामाणिकपणा, नैतिकता अशा गुणांबरोबर या व्यक्ती पारंपरिक वृत्तीच्या असतात.

मेष राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल कार्यक्षेत्र

प्रशासकीय क्षेत्रात, पोलीस दल अशा क्षेत्रात प्रामुख्याने मेष राशीच्या व्यक्ती दिसून येतात. कुंडलीत ग्रहांची शुभस्थिती असली तरच या क्षेत्रात त्यांचे करीअर होते. मेष राशीच्या व्यक्ती प्रशासकीय क्षेत्राबरोबरच संरक्षण दलातही दिसतात. या राशीच्या दशमात शनिची मकर रास येते. मकर रास दशमात असणाऱ्या व्यक्ती करीअरसाठी खूप परिश्रम घेणाऱ्या असतात. व्यवसायात असो की नोकरी दोन्हीकडे त्या खूप मेहनत व भरपूर कष्ट घेतात. कष्टाळू व्यक्ती असतात. या दशमाचा स्वामी शनि सहाव्या स्थानात असेल तर या व्यक्ती साधारणत नोकरी करणाऱ्या दिसून आल्या आहेत. कारण शनि हा सेवा वृत्तीचा ग्रह असून शनि अन्य ठिकाणी असणाऱ्या व्यक्ती क्वचितच नोकरी करणाऱ्या दिसतील. त्या व्यक्ती व्यवसायामध्ये वावरताना दिसतात. स्वतंत्र व्यवसायाची धारणा यांच्यात रुजलेली असते व बऱ्याच वेळा नोकरी ऐवजी व्यवसायाकडे कल राहतो.

शनि जसा सेवावृत्तीचा कारक असतो व तशी स्टील उद्योगासाठी सुध्दा त्याची महत्त्वाची भूमिका असते. खाण उद्योग किंवा दगडाच्या खाणी यांचा व्यवसाय तसेच मातीशी संबंधीत उद्योग हे सुद्धा मेषच्या व्यक्ती करू शकतात. सिमेंट आणि स्टील यांच्या संबंधातून येणारा बांधकाम उद्योग हा सुद्धा मेष व्यक्तीच्या करिअरसाठी फायदेशीर ठरतो. जमीन ही तर मंगळाच्या अधिपत्याखाली असते. त्यामुळे जमीन, प्रॉपर्टी संबंधीचे व्यवसाय अर्थात जमिनीचे व्यवसाय, रस्ते तयार करणे, इमारती बांधणे तसेच सोन्याचे व पंचधातूचे दागिने किंवा पंचधातूच्या मूर्ती करण्याच्या कारागिरीचा व्यवसाय या राशीच्या व्यक्तींना करायला हरकत नाही.

मेष राशीमध्ये केतूचे अश्विनी नक्षत्र येते. केतू शुक्राच्या युतीत असेल तर कोणत्याही कलेत चित्रकला, नाट्यकला अभिनय, फॅशन डिझाईनींग, फोटोग्राफी इत्यादि कलेमध्ये करियर करण्याची शक्यता राहील. केतू रवीच्या युतीत असेल तर सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात तसेच वैद्यकीय क्षेत्रात फार्मसी कंपनीत औषधनिर्मिती क्षेत्रात करीअर करता येईल. चंद्राच्या युतीत असेल तर दुग्धजन्य उत्पादन क्षेत्रात दूध डेअरीचा व्यवसाय किंवा औषध निर्मिती क्षेत्रात करीअर करू शकेल. गुरूच्या युतीत असेल आर्थिक क्षेत्रात सल्लागार शैक्षणिक क्षेत्रात करीयर करेल. मंगळाच्या युतीतला केतू पोलीस दल संरक्षक दलात तसेच बांधकाम व्यवसायात, सिव्हील इंजिनीअर आर्किटेक्ट सारख्या व्यवसायात करीअर करील. केतू बुधाच्या युतीत असेल जाहिरात कला, प्रिंटिग व्यवसायात करियर करतील. मेष राशीच्या व्यक्तींचा प्रामुख्याने नोकरीपेक्षा व्यवसायाकडे अधिक असतो.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

Whats_app_banner
विभाग