Rahu : अशुभ मानला गेलेला राहूसुद्धा देऊ शकतो शुभ फल
Rahu Can Give You Good Results : अशुभ मानले गेलेले राहूकेतू कधी कधी शुभ फलही देऊ शकतात, असं जर सांगितलं तर भूवया उंचावतील.
तुमच्या राशीत राहू आहे असं आपल्याला एखाद्या ज्योतिषाने सांगितल्यावर आपण गांगरतो. राहू आणि केतू ही ग्रहांची जोडी अत्यंत धोकादायक जोडी म्हणून ज्योतिषशास्त्रात सांगितली गेली आहे. ज्याचा राशीला हे दोन ग्रह लागले किंवा यांच्यापैकी एक जरी आला तरीही आयुष्य वेदनादायक होतं, अचानक आयुष्यातली सर्व सुखं गायब होतात. मग यांना शांत करायला काही उपाय करावे लागतात. तेव्हा या अनिष्ट ग्रहांच्या तावडीतून आपली सुटका होते. यांची शांती करता येणार नाही असं सांगितल्यावर आपण त्यांचा राशीतून जाण्याची वाट पाहात बसतो.
ट्रेंडिंग न्यूज
यो दोन ग्रहांची इतकी धास्ती सर्वसामान्य लोकांना वाटत असते. असं वाटतं की चुकूनही हे ग्रह आपल्या राशीला येऊ नयेत. मात्र अशुभ मानले गेलेले राहूकेतू कधी कधी शुभ फलही देऊ शकतात, असं जर सांगितलं तर भूवया उंचावतील.
पण हे खरं आहे. ज्योतिष शास्त्रात सांगितलं गेल्या प्रमाणे राहू ग्रह तुमच्या राशीत असेल आणि तो अमुक एका घरात असेल तर त्याने शुभ फल प्राप्ती होऊ शकते. त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत.
अशुभ राहू देऊ शकतो शुभ फल
कुंडलीतले तिसरे आणि सहावे स्थान
ज्योतिष शास्त्रानुसार जर राहू तुमच्या कुंडलीत तिसऱ्या घरात असेल तर राहू धैर्य आणि काहीतरी खास करण्याची क्षमता देतो.
राहू सहाव्या घरात असल्यास तो शत्रूंवर विजय मिळवून रोग, शोक आणि कर्जापासून आपल्याला मुक्त ठेवतो.
दशम स्थान
ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु ग्रह दहाव्या स्थानावर असेल तर राजयोग तयार होतो.
कुंंडलीत सूर्य बलवान असेल तर दहाव्या घरात बसलेला राहू व्यक्तीला राजकारणात खूप यशस्वी करतो.
अकरावे स्थान
ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील अकराव्या घरात राहू खूप शुभ फळ देतो. तुम्हाला अचानक धनलाभ होतो.
त्याचप्रमाणे जर तुमचा जन्म मकर राशीत झाला असेल तर राहू तुम्हाला खूप फायदेशीर मानला जातो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)