Surya-Budha Yuti 2025 January: ज्योतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्रांच्या संयोगाने तयार होणाऱ्या राजयोगाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत राजयोगाचा प्रभाव आहे. काही राशींवर राजयोगाचा शुभ प्रभाव असल्याने जीवनात सुख-संपत्तीत वाढ होते, तर काही राशींना सामान्य लाभ प्राप्त होतात. जानेवारीत बुध आणि सूर्य मिळून बुधादित्य राजयोग तयार करतील.
यावेळी सूर्य धनु राशीत विराजमान असून बुध ०४ जानेवारीला धनु राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत धनु राशीत रवी-बुधाची युती बुधादित्य राजयोग तयार करेल. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात तयार झालेला बुधादित्य राजयोग अनेक राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घ्या, बुधादित्य राजयोगाचा कोणत्या राशींना होईल फायदा, त्याच प्रमाणे हा फायदा या भाग्यशाली राशींना कशाप्रकारे मिळेल हेही जाणून घ्या…
बुधादित्य राजयोग वृषभ राशीच्या जातकांसाठी सकारात्मक परिणाम घेऊन येईल. या काळात तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. नातेसंबंध सुधारतील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील.
बुधादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या जातकांसाठी जानेवारी २०२५ चा महिना लाभदायक ठरणार आहे. या काळात रोजगाराच्या शोधात असलेल्यांना योग्य पद मिळू शकते. या जातकांचे जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कन्या राशीच्या जातकांची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती मजबूत राहील.
तूळ राशीच्या जातकांना जानेवारी २०२५ मध्ये प्रत्येक क्षेत्रातून चांगले लाभ मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. आर्थिक बाबतीत विजय मिळवाल. कार्यजीवन आणि वैयक्तिक जीवन यांच्यात समतोल साधता येईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होऊ शकते.
मीन राशीच्या जातकांसाठी रवी-बुध युती शुभ ठरणार आहे. जानेवारीच्या सुरुवातीला एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होईल. सुख-संपदेत वाढ होईल. धन-धान्यात वाढ होईल. नशीब साथ देईल. ऑफिसमध्ये कोणतेही महत्त्वाचे काम करण्यात वरिष्ठांची मदत मिळेल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या