Budha Gochar: ४ जानेवारीला बुध करेल धनु राशीत प्रवेश, या राशींना होईल फायदा
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Budha Gochar: ४ जानेवारीला बुध करेल धनु राशीत प्रवेश, या राशींना होईल फायदा

Budha Gochar: ४ जानेवारीला बुध करेल धनु राशीत प्रवेश, या राशींना होईल फायदा

Jan 01, 2025 05:48 PM IST

Budha Gochar : ज्योतिषशास्त्रात बुधाला विशेष स्थान आहे. बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, चतुराई आणि मैत्रीचा ग्रह मानला जातो. बुधाला राजकुमार म्हणतात.

४ जानेवारीला बुध करेल धनु राशीत प्रवेश, या राशींना होईल फायदा
४ जानेवारीला बुध करेल धनु राशीत प्रवेश, या राशींना होईल फायदा

Budha Gochar: ज्योतिषशास्त्रात बुधाला विशेष स्थान आहे. बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, चतुराई आणि मैत्रीचा ग्रह मानला जातो. बुधाला राजकुमार म्हणतात. ०४ जानेवारी २०२५ रोजी बुध वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. बुधाच्या धनु राशीतील प्रवेशामुळे काही राशींना फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया, बुधाने धनु राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींना फायदा होईल.

मिथुन

धनु राशीत बुध हा ग्रह असणे तुमच्यासाठी शुभ राहील. या ग्रहस्थितीमुळे तुम्हांला आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा. जोडीदारासोबत चांगले संबंध निर्माण होतील, आरोग्यही चांगले राहील. आदरणीय लोकांना भेटू शकता, तसेच एखादी चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबासमवेत तीर्थस्थळी जाण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थी असाल तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

बुध ग्रहाचा धनु राशीत प्रवेश किंवा बुध ग्रहाचे गोचर धनु राशीच्या जातकांसाठी शुभ राहील. तुमचा मान-सन्मान वाढेल, अधिकारी आनंदी होतील. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. तसेच ग्रहांच्या या स्थितीमुळे आपणांस आर्थिक लाभ, तसेच मागील काही कामे मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबासमवेत बाहेर फिरायला जाऊ शकता. त्याच प्रमाणे तुम्हांला सावध राहण्याची, धीराने चांगल्या काळाची वाट पाहण्याची नितांत गरज आहे. रक्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. याबाबत तुम्हांला काळजी घ्यावी लागेल.

धनु

बुध हा ग्रह ४ जानेवारी रोजी धनु राशीत प्रवेश करत आहे. हा प्रवेश धनु राशीच्या जातकांसाठी चांगला राहील. या ग्रहस्थितीमुळे धनु राशीचे जातक एखाद्या शुभ कार्यावर पैसे खर्च करू शकतात. तसेच धनु राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील, रिअल इस्टेटचा व्यवहार करू शकाल, खरेदी-विक्रीत फायदा होऊ शकतो. अर्धवट असलेली माहिती तुम्ही अद्ययावत करा. आरोग्य चांगले राहील, व्यवसायात नवीन दिशेने लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक सुख मिळू शकते, विद्यार्थी असाल तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner