मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Budh Vakri 2024 : शनीनंतर आता बुध होणार वक्री! 'या' राशींचे उजळणार भाग्य, मिळणार अपार संपत्ती

Budh Vakri 2024 : शनीनंतर आता बुध होणार वक्री! 'या' राशींचे उजळणार भाग्य, मिळणार अपार संपत्ती

Jul 05, 2024 10:24 AM IST

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह राशीचक्रातील बाराही राशींवर प्रभाव टाकत असतात. नुकतंच शनीदेवाने वक्री केली आहे. त्याचा अनेक राशींना फायदा होत आहे.

Budh Vakri 2024 : शनीनंतर आता बुध होणार वक्री! 'या' राशींचे उजळणार भाग्य, मिळणार अपार संपत्ती
Budh Vakri 2024 : शनीनंतर आता बुध होणार वक्री! 'या' राशींचे उजळणार भाग्य, मिळणार अपार संपत्ती

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह राशीचक्रातील बाराही राशींवर प्रभाव टाकत असतात. वास्तविक ग्रहांच्या स्थान बदलातूनच राशींचे भविष्य ठरत असते. ग्रह एका निश्चित कालावधीनंतर आपली राशी परिवर्तन करत असतात. यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. ग्रह गोचर करताना मार्गी आणि वक्री होतात. मार्गी म्हणजे सरळ दिशेत प्रवास करणे. याउलट वक्री म्हणजे ग्रह उलट दिशेने प्रवास करतात. बऱ्याचवेळा ग्रहांची वक्री चाल राशींसाठी अशुभ असते. मात्र काहीवेळा ग्रह वक्री काही राशींसाठी अत्यंत शुभ असते. नुकतंच शनीदेवाने वक्री केली आहे. त्याचा अनेक राशींना फायदा होत आहे.

दरम्यान आता व्यापार आणि धन दाता बुध वक्री करणार आहे, अर्थातच आपली उलट चाल चालणार आहे. बुधला व्यापार, धन, बुद्धी, ज्ञान यांचा कारक मानला जातो. बुध बहुतांश वेळा राशींवर शुभ प्रभावच टाकत असतो. दरम्यान येत्या ५ ऑगस्टला बुध सिंह राशीतून वक्री होणार आहे. बुधच्या या उलट चालीचा सकारात्मक परिणाम राशीचक्रातील काही राशींवर पडणार आहे. या राशींचे नशीब उजळणार आहे. बुध वक्रीत फायद्यात असणाऱ्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

सिंह

बुध वक्रीचा विशेष लाभ सिंह राशीला होणार आहे. कारण बुध सिंह राशीमधूनच वक्री होणार आहे. याकाळात तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. तुमच्यामध्ये एक नवी ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. मनात ठरविलेल्या योजना याकाळात पूर्ण होतील. व्यवसाय आणि व्यापारात आर्थिक फायदा होईल. नव्या डील्स पदरी पडतील. याकाळात केलेली गुंतवणूक तुम्हाला फलदायी ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध सुधारतील. महत्वाच्या कामात भावंडाची साथ मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. यातून नाते अधिक दृढ होईल. नोकरदार वर्गाला बढती मिळू शकते. अनपेक्षित मार्गाने वेळोवेळी धनलाभ होतील. त्यातून आर्थिक स्थिती उत्तम होईल.

तूळ

बुध ग्रहाच्या विक्री चालीचा फायदा तूळ राशीच्या लोकांनासुद्धा होणार आहे. कारण बुध या राशीच्या धन आणि लाभ या स्थानावर वक्री होणार आहे. याकाळात पैशांची आवक वाढेल. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. घरातील भौतिक सुखसुविधामध्येदेखील वाढ होईल. नोकरदार वर्गाला कार्यक्षेत्रात नवीन संधी उपल्बध होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. याकाळात कोणत्याही क्षेत्रात केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास लाभ होऊ शकतो.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा बुध वक्रीचा प्रचंड लाभ होणार आहे. कारण बुध या राशीच्या कर्म भावावर वक्री होणार आहे. बुध वक्रीच्या काळात तुमच्या उद्योग-व्यापारात प्रचंड लाभ होईल. करिअरमध्ये नवनव्या संधी उपल्बध होतील. त्यातून आर्थिक लाभसुद्धा होईल. अनपेक्षितपणे धनलाभ होईल. आर्थिक स्थिती भक्कम झाल्याने राहणीमानात सुधारणा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत रोमँटिक डेट प्लॅन कराल. एकमेकांसोबत मनमोकळा संवाद झाल्याने नात्यात गोडवा निर्माण होईल.

WhatsApp channel