Budh Surya Yuti : बुध-सूर्यची वृश्चिक राशीत युती; या ३ राशींसाठी भरभराटीचा काळ, गुंतवणूकीतून मिळेल नफा
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Budh Surya Yuti : बुध-सूर्यची वृश्चिक राशीत युती; या ३ राशींसाठी भरभराटीचा काळ, गुंतवणूकीतून मिळेल नफा

Budh Surya Yuti : बुध-सूर्यची वृश्चिक राशीत युती; या ३ राशींसाठी भरभराटीचा काळ, गुंतवणूकीतून मिळेल नफा

Nov 20, 2024 10:11 AM IST

Budh Surya Yuti In Marathi : सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करताच बुधादित्य योग तयार झाला आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत बुध या राशीत राहील. वृश्चिक राशीत रवि-बुध असल्याने काही राशींसाठी काळ अत्यंत भाग्यशाली ठरू शकतो. जाणून घ्या या लकी राशी कोणत्या आहेत.

सूर्य बुध युती २०२४ बुधादित्य योगाचा शुभ परिणाम
सूर्य बुध युती २०२४ बुधादित्य योगाचा शुभ परिणाम

Budhaditya Yog Positive Impact In Marathi : ग्रहांची हालचाल राशीचक्रातील प्रत्येक राशीवर परिणामी ठरते. प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या लोकांसाठी सकारात्मक, फायदेशीर ठरते तर काही राशीच्या लोकांसाठी नकारात्मक, नुकसानदायक ठरते. ग्रहाच्या बदलानंतर दोन ग्रह एकत्र आल्यास ग्रहांची युती होते. ग्रहांची युती झाल्यास अनेक शुभ योगही तयार होतात.

सूर्याने आपला वेग बदलला आहे. १६ नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य ग्रहाने मंगळाच्या वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. ग्रहांचा राजकुमार बुध आधीच वृश्चिक राशीत विराजमान आहे. सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करताच बुधादित्य योगाची निर्मिती झाली आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार सूर्य ग्रह पुढील संक्रमण १५ डिसेंबर रोजी आणि बुध ४ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बनलेला बुधादित्य योग १४ डिसेंबरपर्यंत राहील. अशात जाणून घेऊया हा बुधादित्य योग कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे.

तूळ राशीच्या लोकांवर बुध-सूर्य युतीचा शुभ परिणाम

राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि बुधाचे संक्रमण फायदेशीर मानले जाते. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे व्यापाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. स्वत:ला तणावमुक्त आणि आनंदी ठेवण्यासाठी निसर्गात वेळ घालवा. आरोग्याची काळजी घ्या.

मकर राशीच्या लोकांवर बुध-सूर्य युतीचा शुभ परिणाम

बुध आणि सूर्याचे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. आर्थिक स्थितीत पूर्वीच्या तुलनेत सुधारणा दिसू शकते. आरोग्याची काळजी घ्या. उपासनेत मन गुंतवून ठेवणे चांगले राहील.

वृश्चिक राशीच्या लोकांवर बुध-सूर्य युतीचा शुभ परिणाम

वृश्चिक राशीसाठी बुध आणि सूर्याचे संक्रमण शुभ मानले जाते. उद्योगपतींसाठी हा काळ चांगला मानला जात आहे. पैशाची आवक होईल. काही लोक कर्जापासून मुक्त होऊ शकतील. कुटुंबासमवेत प्रवासाची योजना आखू शकाल. गुंतवणूक म्हणूनही हा काळ चांगला मानला जातो.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner