Budh-Shukra Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १९ जुलै २०२४ रोजी, ग्रहांचा राजकुमार म्हणवल्या जाणाऱ्या बुध ग्रहणे सिंह राशीत प्रवेश केला होता. आता तो पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे २२ ऑगस्टपर्यंत याच राशीत राहणार आहे. दरम्यान, ३१ जुलै रोजी धनाचा दाता शुक्र ग्रह आपली दिशा बदलून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह २५ ऑगस्टपर्यंत याच राशीत राहणार आहे. याचाच अर्थात आता बुध आणि शुक्राची युती होणार आहे. या युतीचा काही राशीच्या लोकांना भरपूर फायदा होणार आहे. ३१ जुलै २०२४ रोजी सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्राचे मिलन होणार असून, या संयोगाचा पाच राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया या कोणत्या पाच राशी आहेत, ज्यांच्यासाठी बुध-शुक्र युती भाग्यशाली ठरेल...
या काळात विवाहित लोक आपल्या कुटुंबासमवेत धार्मिक प्रवासाला जाऊ शकतात. व्यावसायिकांना जुन्या अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रभावी मार्ग मिळेल. मेष राशीच्या लोकांना भावंडांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. यासोबतच तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे संबंधही चांगले राहतील.
मकर राशीच्या लोकांचे कौटुंबिक संबंध दृढ होतील. जे लोक दीर्घकाळापासून बेरोजगार आहेत, त्यांना त्यांच्या आवडीच्या कंपनीत नोकरी मिळू शकते. जे लोक परदेशात काम करण्याचे स्वप्न पाहत आहे, त्यांना मोठ्या कंपनीकडून परदेशात काम करण्याची ऑफर मिळू शकते.
सूर्याचं अधिपत्य असणाऱ्या सिंह राशीच्या लोकांना बुध आणि शुक्र यांच्या संयोगाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण, या राशीमध्येच दोन्ही ग्रहांची भेट होत आहे. नोकरदार लोकांची प्रगती होईल. विवाहित लोकांना नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांना आनंद मिळेल. व्यावसायिकांना आर्थिक फायदा होईल. तसेच, तुमचा व्यवसाय यशाच्या शिखरावर पोहोचेल.
दुकानदारांना आगामी काळात चांगला नफा होईल, ज्यामुळे तुम्ही कर्जाचे पैसे सहज परत करू शकाल. व्यावसायिकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील. ज्यांना आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी आहे, त्यांना त्यांच्या आरोग्याच्या समस्येवर उपाय मिळेल.
गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला बरे वाटत नसेल तर काळजी करू नका. आगामी काळात तुमची तब्येत सुधारणार आहे. व्यवसायात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्पन्न देखील वाढेल.
संबंधित बातम्या