जोतिष शास्त्रांमध्ये ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलांना विशेष महत्व देण्यात आले आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या स्थान बदलाने राशीचक्रातील १२ राशींवरसुद्धा शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतो. ग्रहांच्या या हालचालींमुळे अनेक लाभदायक राजयोगांची निर्मिती होत असते. हे राजयोग काही राशींना अतिशय शुभ लाभ देत असतात. ज्यामुळे त्यांचे नशीबच चमकते. अनेक क्षेत्रात फायदा होतो. ग्रह-नक्षत्रांमुळे बुधादित्य योग, गुरुआदित्य योग, धन योग, लक्ष्मी नारायण योग असे अनेक राजयोग जुळून येत असतात. आज आपण लक्ष्मी नारायण योग म्हणजे नेमके काय? आणि या योगामुळे कोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.
एखाद्या व्यक्तीच्या राशीत राजयोग असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात सुखसमृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. ३१ मे रोजी बुध ग्रहाने वृषभ राशीत संक्रमण केले आहे. तत्पूर्वी या राशीत आधीच सूर्य, शुक्र आणि गुरु विराजमान आहेत. वृषभ राशीत बुध आणि शुक्र ग्रहाची युती झाल्याने लक्ष्मी नारायण योग घटित झाला आहे. या युतीवर बृहस्पती देवाची कृपादृष्टीसुद्धा असणार आहे. लक्ष्मी-नारायण योग अनेक राशींच्या आयुष्यात चमत्कारिक अनुभव देणारा ठरतो. जोतिष शास्त्रानुसार बुध आणि शुक्राच्या युतीने जो योग निर्माण होतो त्याला लक्ष्मी नारायण योग म्हणतात.
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत लक्ष्मी नारायण हा राजयोग घटित होत असेल तर त्या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्यास सुरुवात होते.
बुध आणि शुक्राच्या संयोगाने या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि भरभराटी यायला लागते.
त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व अचानक खुलून येते. बौद्धिक आणि वैचारिक क्षमता वाढते.
लक्ष्मी नारायण योग असलेल्या राशींना कोणत्याही क्षेत्रात संघर्ष करावा लागत नाही. त्यांना काहीही कष्ट न करता यश प्राप्त होते.
जोतिष शास्त्रानुसार यंदा ३१ मे २०२४ पासून जुळून आलेल्या लक्ष्मी नारायण राजयोगाचा फायदा राशीचक्रातील काही राशींना मिळत आहे. यामध्ये कन्या, तूळ, धनु आणि मकर या राशींना लक्ष्मी नारायण राजयोग लाभदायक ठरत आहे. या योगामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतील. आर्थिक गोष्टींसंबंधी रखडलेली कामे मार्गी लागतील. कमाईचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले मतभेद दूर होऊन नातेसंबंध सुधारतील. त्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोगाला विशेष महत्व आहे.