budh margi august 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह वक्री होऊन पुन्हा मार्गी होण्याची घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याचा विविध राशींवर खोलवर परिणाम होतो, असं मानलं जातं. हिंदू दिनदर्शिकेनुसार, ऑगस्ट महिन्यात वक्री अवस्थेत असलेला ग्रहांचा राजकुमार बुध काही दिवसांतच चाल बदलणार आहे. तो मार्गी होणार आहे.
५ ऑगस्टपासून वक्री असलेला बुध सुमारे २४ दिवसांनंतर आपली चाल बदलेल आणि २९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ०२ वाजून ४३ मिनिटांनी कर्क राशीत मार्गी होईल. ज्योतिषीय गणनेनुसार कर्क राशीत बुध ग्रहाचं सरळ मार्गक्रमण काही राशींचं झोपलेलं भाग्य उजळवणार आहे. त्याचबरोबर काही राशींना आयुष्यात चढ-उतारांनाही सामोरं जावं लागू शकतं. चला जाणून घेऊया बुध मार्गी (gochar) झाल्यानं कोणत्या राशीचं नशीब चमकणार आहे.
बुध ग्रह मार्गी झाल्यामुळं वृषभ राशीवर आशीर्वादाचा वर्षाव होईल. नोकरी-व्यवसायातील अडथळे दूर होतील. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक सुवर्णसंधी प्राप्त होतील. व्यवसायात प्रचंड नफा होईल. शत्रूंचा पराभव होईल. न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळेल. पैशाचे नवे मार्ग प्रशस्त होतील. तब्येतीत सुधारणा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचं मार्गी होणं हे एखाद्या वरदानापेक्षा असेल. या कालावधीत या राशीच्या जातकांना प्रत्येक कामाचे इच्छित परिणाम मिळतील. मालमत्तेचे वाद मिटतील. प्रत्येक क्षेत्रात अफाट यश संपादन कराल. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. वाणी मृदू राहील. जोडीदाराचं प्रेम आणि सहकार्य मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला योग होईल. तुमचं आरोग्यही उत्तम राहील.
कन्या राशीच्या लोकांना बुध जबरदस्त लाभ देईल. जीवनात भरपूर ऊर्जा आणि उत्साह राहील. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायाची स्थिती मजबूत राहील. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अडचणी संपुष्टात येतील. करिअरमध्ये अफाट यश मिळेल. नात्यांमधील दुरावा कमी होईल. जोडीदाराकडून भरपूर प्रेम आणि पाठिंबा मिळेल. वैयक्तिक जीवनात शांतता आणि आनंदाचं वातावरण राहील.