Budh Gochar : येत्या १५ दिवसांत 'या' राशींचे नशीब पालटणार! बुधच्या कृपेने मिळणार अफाट पैसा, येणार श्रीमंती
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Budh Gochar : येत्या १५ दिवसांत 'या' राशींचे नशीब पालटणार! बुधच्या कृपेने मिळणार अफाट पैसा, येणार श्रीमंती

Budh Gochar : येत्या १५ दिवसांत 'या' राशींचे नशीब पालटणार! बुधच्या कृपेने मिळणार अफाट पैसा, येणार श्रीमंती

Jul 04, 2024 08:37 AM IST

तब्बल १ महिन्यांनंतर बुध राशी बदलणार आहे. येत्या १९ जुलै २०२४ रोजी बुध कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

बुध ग्रहाचा राशींवर प्रभाव
बुध ग्रहाचा राशींवर प्रभाव

ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रह बाराही राशींवर थेट प्रभाव टाकत असतात. त्यामुळे ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्व आहे. ग्रहांच्या स्थान बदलांचा एक विशेष कालावधी असतो. त्या निश्चित कालावधीतच ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. काही ग्रह अत्यंत कमी कालावधीत राशी परिवर्तन करतात तर काही ग्रह मोठा कालावधी घेतात. याकाळात निर्माण होणाऱ्या योगांचा फायदा राशींना मिळत असतो. ग्रह जितका वेळ त्या राशीत विराजमान असतात या राशींना तितका वेळ फायदा किंवा नुकसान सहन करावा लागतो.

दरम्यान नऊ ग्रहांपैकी एक विशेष ग्रह व्यापार दाता बुध आपली राशी परिवर्तन करणार आहे. तब्बल १ महिन्यांनंतर बुध राशी बदलणार आहे. येत्या १९ जुलै २०२४ रोजी बुध कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्य आणि बुध मैत्री घरात आहेत. त्यामुळे राशीचक्रातील काही राशींना बुध अत्यंत शुभ प्रभाव देणार आहे. याकाळात त्या राशींना अनेक लाभदायक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

सिंह

बुध सिंह राशीत प्रवेश करणार असल्याने या राशीवर शुभ प्रभाव पडणे साहजिक आहे. सिंह राशीला याकाळात विशेष लाभ मिळणार आहे. बुध सिंह राशीच्या लग्न घरात प्रवेश करत असल्याने या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व प्रचंड खुलून येणार आहे. याकाळात व्यवसायिकांना, व्यापाऱ्यांना आर्थिक फायदा होईल. शिवाय व्यापार दाता असणाऱ्या बुधच्या प्रभावात एखादी गुंतवणूक केल्यास त्यातून चांगला परतावा मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले मतभेद दूर होतील. वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येईल.

मिथुन

बुधच्या शुभ प्रभावात हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. कारण बुध मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे या राशीला दुहेरी फायदा मिळणार आहे. बुध मिथुन राशीच्या तिसऱ्या घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना समाजात मानसन्मान प्रतिष्ठा प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढेल. व्यवसायिक प्रतिस्पर्धकांवर विजय मिळतील. त्यातून आर्थिक फायदा होईल. या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे विविध मार्ग खुले होतील. महत्वाच्या कामात भावंडांकडून सहकार्य मिळेल. नोकरदार वर्गाला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ

बुध ग्रहाच्या शुभ प्रभावाचा फायदा कुंभ राशीच्या लोकांनासुद्धा होणार आहे. बुध कुंभ राशीच्या सातव्या घरात भ्रमण करत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणारे प्रसंग घडून येतील. अनपेक्षित मार्गाने धन प्राप्त झाल्याने आनंदात भर पडेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना या काळात विशेष लाभ होणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळण्याचा योग आहे. शिवाय काही लोक वाहन किंवा स्थावर संपत्ती खरेदी करू शकतात.

Whats_app_banner