हिंदू धर्मात नवग्रहांना फार महत्व आहे. प्रत्येक ग्रहाचे राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ग्रहांचा एक कालावधी निश्चित आहे त्यानुसार हे संक्रमण होत असते. ग्रहाच्या संक्रमणाचा राशीचक्रातील प्रत्येक राशीवर तसेच मानवी जीवनावर, देश-जगावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. सध्या नवरात्रोत्सवामुळे सगळीकडे आनंदोत्सव सुरू आहे. या नवरात्रोत्सवातच ऑक्टोबर महिन्याचे बुध गोचर होत आहे.
नवरात्रोत्सवाच्या सातव्या तिथीला गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी बुध ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत जाईल. अशाप्रकारे, बुध तूळ राशीत गेल्याने अनेक राशींवर परिणाम होईल. काही राशींना लाभाची शक्यता आहे. पंचांगनुसार १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी बुधाचे तूळ राशीत संक्रमण होणार आहे. तूळ राशीमध्ये बुध असल्याने आपले मन संतुलनावर लक्ष केंद्रित करेल. चला जाणून घेऊया की बुध ग्रहाच्या राशीतील बदलाचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांसाठी भरपूर धनलाभाचा राहील.
वृषभ राशीच्या लोकांनी यावेळी व्यावसायिक आणि वैयक्तिक संधींसाठी तयार राहावे. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये असंख्य नवीन फायदेशीर संधी आणि नवीन प्रकल्प मिळतील. फक्त तुमच्या प्रगतीसाठी या संधींचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न करा.
कर्क राशीच्या लोकांना बुध संक्रमणाचा चांगला प्रभाव दिसेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात. तुम्हाला व्यवसायात नवीन सौदे देखील मिळू शकतात.
कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला आधीच पैशाची चिंता होती, त्यामुळे हा लाभ योग्य असेल. बोलण्यात गोडवा राहील. याशिवाय परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल, ते चांगल्या मार्कांनी पास होऊ शकतात.
वृश्चिक राशीच्या लोकांना अचानक लाभ होईल. तुम्हाला अशा गुंतवणुकीच्या संधी मिळतील ज्यातून तुम्हाला दीर्घकाळ नफा मिळेल. वैयक्तिक जीवन देखील चांगले आहे.
कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन चांगले राहील. समाजात तुम्हाला महत्त्व दिले जाईल. कुंभ राशीच्या लोकांना पूर्वीच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. एकंदरीत बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ आहे.
मकर राशीचे लोक थोडे क्रिएटिव्ह होतील. समाजात तुमचा मान-सन्मान होईल. वैयक्तिक जीवनात चांगले सामंजस्य राहील. नोकरीसाठी दिलेल्या परीक्षेत यश मिळेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)