ग्रहांचे संक्रमण आणि नक्षत्र परिवर्तन हे ज्योतिषशास्त्रात महत्वाचे आहे. ग्रहाचे गोचर आणि नक्षत्र परिवर्तन होणे मानवी जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभावी ठरते. प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र बदलून संक्रमण करतो.
ग्रहांचा राजकुमार बुध याला कुंडलीत विशेष स्थान आहे. बुद्धिमत्ता, मैत्री, तर्कशास्त्र, ज्ञान, संवाद, भाषा, एकाग्रता, सौंदर्य आणि त्वचा यासाठी हा ग्रह कारक मानला जातो. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. जेव्हा जेव्हा बुध कोणत्याही राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा प्रत्येक राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडतो.
ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह राशी बदलत आहे. नवरात्री पक्षामध्ये बुध कन्या राशीतून तूळ राशीत जात आहे. आत्तापर्यंत कन्या राशीत बुधासोबत आणखी तीन ग्रह होते आणि चतुर्ग्रही योग तयार झाला होता. १० ऑक्टोबरला बुध ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत जाईल. २९ ऑक्टोबर पर्यंत बुध ग्रह तूळ राशीत गोचर करेल. १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी बुधाचे तूळ राशीतील संक्रमण अनेक राशींवर परिणाम करेल. जाणून घेऊया नवरात्रीमध्ये बुध ग्रहाच्या तूळ राशीत गेल्याने कोणत्या राशींवर परिणाम होईल.
बुध ग्रहाचे तूळ राशीतील गोचर मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल नाही. मेष राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता राहील, ज्यामुळे ते कुटुंबातील सदस्यांसोबत कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलू शकणार नाहीत. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहे, त्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी कमी होण्याची शक्यता राहील. जे लोक नोकरी करतात त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत कमी होऊ शकतात, ज्यामुळे घरची आर्थिक स्थिती देखील बिघडू शकते.
बुध गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी अशुभ आहे. व्यापाऱ्यांना नवीन ग्राहक मिळत नसल्याने नफ्याचे तोट्यात रूपांतर होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पगार कपातीची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक संकट ओढवू शकते. वैवाहिक जीवनात तणावामुळे विभक्त होण्याची शक्यता आहे.
बुधाचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांच्या करिअरवर नकारात्मक परिणाम करू शकते. नोकरदार लोक आणि व्यावसायिकांचे उत्पन्न वाढण्याऐवजी घटण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम आर्थिक परिस्थितीवर होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात, ज्याचा जोडीदाराच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या