Mercury Transit in Sagittarius: २०२५ या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ४ जानेवारी २०२५ रोजी बुध वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात बुधाला विशेष स्थान आहे. बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, चतुराई आणि मैत्रीचा ग्रह मानला जातो. बुधाला राजकुमार म्हणतात. बुध शुभ असताना एखाद्या व्यक्तीला शुभ फळ मिळत असते. तर बुध जेव्हा अशुभ असतो तेव्हा त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बुध धनु राशीत प्रवेश करत आहे. बुधाच्या धनु राशीत प्रवेशाचा सर्व १२ राशींवर परिणाम होत आहे. जाणून घेऊ या, बुध या ग्रहाने धनु राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊ या.
बुधाने धनु राशीत प्रवेश केल्यामुळे मेष राशीच्या जातकांच्या मनात आनंदाची भावना राहणार आहे. जातकांना नोकरीसाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. या जातकांच्त्पया उत्पन्नात वाढ होईल.अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तसेच त्यांना कुटुंबातील सदस्यांचेही सहकार्य मिळेल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी वेळ शुभ राहील. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल.
मिथुन राशीच्या जातकांच्या कुटुंबातील सुखसोयींचा विस्तार होईल. त्यांच्या कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. आईचे सहकार्य मिळेल. नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. तुमच्या बोलण्यात गोडवा येईल.
सिंह राशीच्या जातकांना कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. कुटुंबात धार्मिक कार्य करता येईल. मित्राच्या मदतीने व्यवसायाचा विस्तार होईल. लाभाच्या संधी प्राप्त होतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कुटुंबासमवेत धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता.
धनु राशीच्या जातकांची व्यवसाय विस्ताराची योजना पूर्ण होईल. बांधवांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात शुभ कार्य होईल. कपड्यांच्या भेटवस्तूही मिळू शकतात. नोकरीत बदल झाल्याने तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. आयात-निर्यात व्यवसायात नफ्याच्या संधी निर्माण होतील. आईचे सहकार्य मिळेल. वाहनसुखात वाढ होऊ शकते. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या