Budh Gochar : फेब्रुवारीमध्ये बुधाचे कुंभ आणि मीन राशीत गोचर; या ३ राशींचे नशीब चमकणार, बक्कळ लाभ होणार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Budh Gochar : फेब्रुवारीमध्ये बुधाचे कुंभ आणि मीन राशीत गोचर; या ३ राशींचे नशीब चमकणार, बक्कळ लाभ होणार

Budh Gochar : फेब्रुवारीमध्ये बुधाचे कुंभ आणि मीन राशीत गोचर; या ३ राशींचे नशीब चमकणार, बक्कळ लाभ होणार

Jan 31, 2025 09:46 AM IST

Budh Gochar February 2025 In Marathi : बुध फेब्रुवारीमध्ये कुंभ आणि मीन राशीत प्रवेश करेल. बुधाचे दुहेरी संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरेल. जाणून घ्या कोणत्या राशींना बुध संक्रमणाचा फायदा होणार.

बुध गोचर फेब्रुवारी २०२५
बुध गोचर फेब्रुवारी २०२५

Budh Grah Gochar In Marathi : प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र बदलत असतो. ग्रहाचे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी शुभ तर काही राशीच्या लोकांसाठी अशुभ सिद्ध होते. आपल्या कुंडलीत ग्रह कोणत्या स्थानावर आहे यानुसार आपल्यावर कसा परिणाम होईल ते ठरते. नवीन वर्ष २०२५ चा दुसरा महिना फेब्रुवारी सुरू होत असून, या महिन्यातही काही ग्रह गोचर करतील ज्याचा राशींवर परिणाम होईल. फेब्रुवारी महिन्यात बुध ग्रह २ वेळा गोचर करणार आहे. 

ग्रहांचा राजकुमार बुध च्या राशीबदलाचाही मेष ते मीन राशीवर परिणाम होईल. बुध जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा परिणाम मेष ते मीन राशीवर होतो. पंचांगानुसार बुध फेब्रुवारीमध्ये दोनदा राशी बदलून कुंभ आणि मीन राशीत गोचर करेल. बुधाची राशी दोनदा बदलल्यास काही राशींना आर्थिक लाभ तसेच व्यवसायात यश मिळेल. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी फेब्रुवारीमध्ये होणारे बुधाचे संक्रमण फायदेशीर ठरेल.

फेब्रुवारी २०२५ मध्ये बुधाचे संक्रमण केव्हा होईल : 

पंचांगानुसार मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी बुध कुंभ राशीत संक्रमण करेल. बुधाचे दुसरे मीन राशीतले संक्रमण गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी होणार आहे.

बुधाचे संक्रमण कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरेल?

मेष- 

फेब्रुवारीमध्ये बुधाचे होणारे दुहेरी संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या काळात बुध १२व्या भावात प्रवेश करेल. बुधाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मोठी भूमिका मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. संपत्ती जमा करण्यात यश मिळेल.

वृषभ- 

बुधाचे दुहेरी संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या राशीच्या लाभ आणि उत्पन्नाच्या स्थानी बुधाचे भ्रमण होईल. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकते. एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळाल्यावर तुम्हाला आनंद वाटेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

मिथुन- 

बुधाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम देईल. तुमच्या राशीच्या कर्म घरामध्ये बुधचे भ्रमण होईल. बुधाच्या प्रभावामुळे नशीब तुमच्या बाजूने राहील. महत्त्वाचे निर्णय घेण्यात यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीसह उत्पन्नात वाढ होऊ शकते.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Whats_app_banner