Budh Gochar Horoscope In Marathi : प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी परिवर्तन करत असतो. ग्रहांच्या राशीपरिवर्तनानंतर सर्व राशींवर चांगला आणि वाईट परिणाम होतो. प्रत्येक ग्रह राशीसह नक्षत्र परिवर्तनही करतो. तसेच ग्रह वक्री चालही चालतात आणि ग्रहांचा उदयही होतो. प्रत्येक ग्रहाचे आपले एक वेगळे महत्व आहे. प्रत्येक राशीसाठी स्वामी ग्रह म्हणूनही ग्रहाचा प्रभाव सदैव राहतो. सप्टेंबर महिना सुरू झाला असून, या महिन्यात सर्वात पहिले बुध ग्रहाचे मार्गक्रमण होणार आहे.
बुध, ग्रहांचा राजकुमार, कोणत्याही राशीमध्ये सुमारे २१ दिवस राहतो आणि त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, तर्क, हुशारी आणि मित्र इत्यादींचा कारक मानला जातो. सध्या बुध कर्क राशीत विराजमान असून, सप्टेंबरच्या सुरुवातीला सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. बुध सिंह राशीत गेल्याने काही राशींना सकारात्मक परिणाम मिळतील. जाणून घ्या बुध ग्रह कधी सिंह राशीत प्रवेश करेल आणि कोणत्या राशीसाठी हे राशी बदल शुभ राहील-
बुधवार, भाद्रपद शुक्ल पक्ष प्रतिपदा, ४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल. वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे हे राशीपरिवर्तन विशेषतः फायदेशीर ठरेल. हे संक्रमण तुमचे प्रेम जीवन, करिअर, व्यवसाय आणि आर्थिक जीवनासाठी चांगले असणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. या काळात तुम्ही सकारात्मक परिणामांमुळे आनंदी व्हाल.
सप्टेंबरमध्ये बुध एकदा नाही तर दोनदा राशी बदलेल. पंचांगनुसार ४ सप्टेंबरनंतर बुधाचे संक्रमण २३ सप्टेंबरला होईल. सोमवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी बुध कन्या राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. अशा परिस्थितीत बुधाचे स्वतःच्या राशीत होणारे संक्रमण काही राशींना फायदेशीर परिणाम देईल. कन्या राशीनंतर ऑक्टोबरमध्ये बुध तूळ राशीत प्रवेश करेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)