Mercury Transit New Year 2025 In Marathi : बुध बुद्धी, वाणी, तर्कशास्त्र, संप्रेषण, गणित, व्यवसाय, लेखा, एकाग्रता, त्वचा, सौंदर्य यांचा कारक मानला जातो. बुध ग्रह हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध ग्रह कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी आहे. वर्षाच्या सुरुवातीला बुध धनु राशीत प्रवेश करेल. यानंतर फेब्रुवारीमध्ये शनीच्या कुंभ राशीत ही गोचर करेल. २०२५ मध्ये बुध १५ वेळा गोचर करेल, वर्ष २०२५ मध्ये बुधाच्या गोचराचा फायदा अनेक राशींना होणार आहे. जाणून घ्या २०२५ मध्ये बुधाचे गोचर आणि कोणत्या राशींसाठी बुधाचे गोचर नशीबवान असेल.
नवीन वर्षात सर्वात पहिले बुध ग्रह सिंहाच्या पंचम भावात भ्रमण करेल. बुधाच्या प्रभावामुळे अनेक राशींना फायदा होईल. व्यापाऱ्यांना विशेष आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बुध विद्यार्थ्यांसाठी चांगले परिणाम देईल. परीक्षेची चांगली तयारी करा, फायदा होईल, सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी बुध लाभाचे संकेत घेऊन येत आहे. बुध या राशीच्या लोकांना कला आणि अभिनयात ओळख देईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठीही बुधाचे गोचर आनंद वाढवणारे ठरेल. व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना फायदा होईल.
रविवार, ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजेपासुन ते गुरुवार, २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १ वाजुन ४३ मिनिटांपर्यंत धनु राशीत संक्रमण करेल. त्यानंतर मकर राशीत प्रवेश करेल.
गुरुवार, २३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजुन ४३ मिनिटांपासुन ते रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे २ वाजुन २७ मिनिटांपर्यंत मकर राशीत संक्रमण करेल. त्यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल.
रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजुन २७ मिनिटांपासुन ते शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ७ वाजुन २३ मिनिटांपर्यंत कुंभ राशीत संक्रमण करेल. त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करेल.
मीन राशीमध्ये शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजुन २३ मिनिटांपासुन ते रविवार, ४ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजुन २७ मिनिटांपर्यंत संक्रमण करेल . त्यानंतर तो मेष राशीत प्रवेश करेल.
रविवार, ४ मे २०२५ रोजी सकाळी ७ वाजुन २७ मिनिटांपासुन ते बुधवार, २१ मे २०२५ रोजी सकाळी ३ वाजुन ३२ मिनिटांपर्यंत राशीत मेष संक्रमण करेल . त्यानंतर तो वृषभ राशीत प्रवेश करेल.
बुधवार, २१ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजुन ३२ मिनिटांपासुन ते शुक्रवार, ६ जून २०२५ रोजी रात्री १० वाजुन २७ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत संक्रमण करेल. त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल.
ते शुक्रवार, ६ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजुन २७ मिनिटांपासुन ते मंगळवार, २४ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजुन ५२ मिनिटांपर्यंत मिथुन राशीत संक्रमण करेल. त्यानंतर कर्क राशीत प्रवेश करेल.
मंगळवार, २४ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजुन ५२ मिनिटांपासुन ते शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजुन ८ मिनिटांपर्यंत कर्क राशीत संक्रमण करेल. त्यानंतर सिंह राशीत प्रवेश करेल
शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६ वाजुन ८ मिनिटांपासुन ते मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री ११ वाजुन २७ मिनिटांपर्यंत सिंह राशीत संक्रमण करेल. त्यानंतर कन्या राशीत प्रवेश होईल.
हे मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजुन २७ मिनिटांपासुन ते शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजुन १७ मिनिटांपर्यंत कन्या राशीत संक्रमण करेल. त्यानंतर तो तूळ राशीत प्रवेश करेल.
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी ९ वाजुन १७ मिनिटांपासुन ते गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारी ३ वाजुन १६ मिनिटांपर्यंत तुळ राशीत संक्रमण करेल. त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
ते गुरुवार, २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजुन १६ मिनिटांपासुन ते मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजुन १८ मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करेल. त्यानंतर तो प्रतिगामी गतीने तूळ राशीत प्रवेश करेल.
हे मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजुन १८ मिनिटांपासुन ते रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजुन ४७ मिनिटांपर्यंत तूळ राशीत संक्रमण करेल. त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
ते रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजुन ४५ मिनिटांपासुन ते सोमवार, २९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजुन ५ मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत संक्रमण करेल. त्यानंतर धनु राशीत प्रवेश होईल.
सोमवार २९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजुन ५ मिनिटांनी बुध धनु राशीत प्रवेश करेल.
या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.
संबंधित बातम्या