मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Budh Gochar : ३१ मे रोजी बुध करणार राशीपरिवर्तन! या ४ राशीच्या लोकांना येणार सुखाचे दिवस

Budh Gochar : ३१ मे रोजी बुध करणार राशीपरिवर्तन! या ४ राशीच्या लोकांना येणार सुखाचे दिवस

May 23, 2024 11:33 AM IST

Mercury Transit 31 May 2024 : बुध ग्रहाच्या संक्रमणाने राशीचक्रातील चार राशींच्या व्यक्तिंचे नशीब पालटणार आहे. या राशींवर त्याचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. पाहूया त्या चार राशी नेमक्या कोणत्या आहेत.

बुध गोचर ३१ मे २०२४
बुध गोचर ३१ मे २०२४

जोतिष शास्त्रात राशीपरिवर्तन ही एक महत्वाची बाब आहे. कारण ग्रह-नक्षत्रांच्या राशी बदलाने विशेष योग आणि तिथींची निर्मिती होत असते. हे योग हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे असतात. हे योग राशीचक्रातील राशींवरसुद्धा प्रभाव टाकत असतात. सांगायचे झाले तर या ग्रहांच्या स्थान बदलवरूनच राशीभविष्य ठरत असते. शास्त्रानुसार, सतत कोणते ना कोणते ग्रह आपली जागा बदलून एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात.

दरम्यान येत्या ३१ मे रोजी अर्थातच मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्रहांचा राजा बुध राशीपरिवर्तन करणार आहे. राशीचक्रातील पहिली राशी मेषमधून राशीपरिवर्तन करीत बुध ग्रह वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. ३१ मे रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हे राशीपरिवर्तन होणार आहे. तब्बल १५ दिवस बुध वृषभ राशीत विराजमान असणार आहे. बुधाच्या संक्रमणाने राशीचक्रातील चार राशींचे मात्र नशीब पालटणार आहे. या राशींवर त्याचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. पाहूया त्या चार राशी नेमक्या कोणत्या आहेत.

मेष

बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा मेष राशीलासुद्धा लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. अनेक दिवसांपासून मनात घोळत असलेली स्वप्ने याकाळात पूर्णत्वास जातील. कामात गती येऊन प्रगतीचा वेग वाढेल. अनपेक्षित मार्गाने अचानक धनलाभ झाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा आनंददायक असेल. तुमच्या बोलण्याचा इतरांवर उत्तम प्रभाव पडणार आहे. अशाने तुमचे व्यक्तिमत्व आणखी उठावदार होईल. नवविवाहित जोडप्यांना लवकरच संतती सुख प्राप्त होणार आहे. एकंदरीत याकाळात सर्वच बाजूंनी तुमचे नशीब उघडणार आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनासुद्धा बुध संक्रमणाचा विशेष फायदा मिळणार आहे. कमी काळात जास्त पैसा कमावण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना कमाईचे नवे स्तोत्र उपलब्ध होतील. त्यातून आर्थिक आवक वाढून हातात पैसा राहील. या राशीचे लोक ३१ मे ते १४ जूनदरम्यान कोणतेही नवे काम सुरु करू शकतात. त्यातून लाभच मिळणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचे स्वप्न याकाळात पूर्ण होऊ शकते. या लोकांची लव लाईफ आणखी बहरणार आहे. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद नाते दृढ होईल.

सिंह

सिंह राशीसाठी बुध संक्रमण आर्थिक आणि करिअर दोन्ही बाजूनी फलदायी ठरणार आहे. या राशीतील नोकरदार वर्गाला करिअरमध्ये अपेक्षेपेक्षा मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत. कमी कालावधीत मोठे यश तुमच्या पदरात पडल्याने आत्मविश्वास वाढीस लागेल. परदेशात नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना शुभ वार्ता मिळू शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आता धनलाभ होण्याचे प्रसंग येतील. त्यामुळे मन उत्साही राहणार आहे.

कन्या

बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा शुभ लाभ कन्या राशीला मिळणार आहे. याकाळात तुमचे सौभाग्य वाढीस लागून सुखाचे दिवस येतील. ३१ मे नंतर या राशीच्या काही लोकांना सरकारी नोकरी मिळण्याचा योग जुळून येत आहे. व्यवसायिकांना नवे आर्थिक प्रकल्प मिळू शकतात. प्रेम विवाह करण्यासाठी प्रयत्न करत असल्यांना यश मिळणार आहे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने सहभागी झाल्याने मानसन्मान प्रचंड वाढेल.

WhatsApp channel
विभाग