ज्योतिषअभ्यासात नऊ ग्रहांना प्रचंड महत्व आहे. य ग्रहांच्या हालचाली अर्थातच राशीपरिवर्तन अतिशय खास असते. कारण ग्रहांच्या स्थान बदलाने राशीचक्रातील बाराही राशी प्रभावित होत असतात. ग्रहांच्या राशी बदलाचा शुभ-अशुभ प्रभाव या राशींवर प्रकर्षाने दिसून येतो. दरम्यान काही ग्रहांच्या स्थान बदलाने शुभ राजयोग जुळून येतात. ज्याचा फायदा राशींना मिळतो. लवकरच बुध ग्रह आपली राशी बदलत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या संक्रमणाने काही राशींना प्रचंड लाभ मिळणार आहे. या राशींचे अक्षरशः नशीब पालटणार असल्याचे दिसून येत आहे.
राशीभविष्यात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. या ग्रहाच्या लहान-मोठ्या प्रत्येक हालचालींचा परिणाम या राशींवर होत असतो. त्याचप्रमाणे मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. बुधला बुद्धी, प्रगती, ज्ञान यांचे प्रतीक समजले जाते. बुध लवकरच आपली मूळ त्रिकोण राशी मिथुनमध्ये प्रवेश करणार आहे. बुधाच्या या प्रवेशाने भद्र राजयोग निर्माण होत आहे. हा राजयोग काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक स्थैर्य ते नोकरीत प्रगती असे अनेक लाभ या राशींना मिळणार आहेत. हा राजयोग तेव्हा निर्माण होतो जेव्हा बुध आपली मूळ राशी मिथुन आणि कन्या राशीच्या आधी प्रथम, चतुर्थ, सप्तम आणि दशम भावात विराजमान असतो. या राजयोगाने राशींच्या आयुष्यात बक्कळ पैसा, ऐश्वर्य, सुखसमृद्धी येते. पाहूया या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
बुधच्या संक्रमणाने तयार होणाऱ्या भद्र राजयोगाचा पुरेपूर लाभ मेष राशीच्या लोकांना मिळणार आहे. ट्रॅव्हलिंग, टुरिझम, सेल्स मार्केटिंग या क्षेत्रांशी संबंधित लोकांना याकाळात प्रचंड फायदा होणार आहे. या राजयोगात तुम्हाला कामासंबंधी अनेक नव्या कल्पना सुचू शकतात. शिवाय उच्च शिक्षण घेणाऱ्यांना याकाळात अनेक नव्या संधी मिळतील. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. या व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ मिळेल. तसेच कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ खुश झाल्याने तुमचा नावलौकिक वाढेल.सहकारी तुमच्याकडे आकर्षीत होतील. मनात घोळत असलेल्या योजना यशस्वीपणे अंमलात आणाल. मनाप्रमाणे गोष्टी घडत असल्याने मन उत्साही आणि प्रसन्न राहील.
भद्र राजयोगाचा बऱ्यापैकी लाभ वृषभ राशीच्या लोकांनासुद्धा होणार आहे. वृषभ राशीसाठी बुध धन भावात विराजमान आहे. त्यामुळे याकाळात तुम्हाला सतत धनलाभ झालेला दिसून येईल. सतत पैसा हातात आल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. याकाळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. शिवाय धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांमध्ये रुची निर्माण होईल. त्यातून मन शांत आणि प्रसन्न राहील. करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. तुमच्या कामावर वरिष्ठ खुश होतील. तुमच्या मितभाषी स्वभावाने लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. आरोग्यसुद्धा उत्तम राहील. घरातील वातावरण अगदी आनंदी असणार आहे.
मिथुन राशीच्या लग्न भावात भद्र राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनासुद्धा भद्र राजयोगाचा प्रचंड लाभ होणार आहे. याकाळात हातात घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. सामाजिक कार्यात आवर्जून सहभाग घ्याल. समाजात मानसन्मान मिळून प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या मधुर वाणीने समोरच्या व्यक्तीला प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. शिक्षक, वकील या क्षेत्रातील लोक आपल्या वाणीच्या साहाय्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळतील. वैवाहिक आयुष्यात सुरु आलेल्या अडचणी दूर होऊन प्रेम वाढीस लागेल. विवाह जुळण्यात अपयश येत असेल, तर ही समस्या लवकरच समाप्त होईल. लग्नाचा प्रस्ताव मिळू शकतो. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील.