मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Devasnan Purnima : जगन्नाथ पुरी येथे रथयात्रेपूर्वी पौर्णिमेला विशेष स्नान पर्व, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

Devasnan Purnima : जगन्नाथ पुरी येथे रथयात्रेपूर्वी पौर्णिमेला विशेष स्नान पर्व, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

Jun 22, 2024 04:14 PM IST
  • twitter
  • twitter
Devasnan Purnima at Jagannath Puri 2024 : 'स्नान यात्रा' ही ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरातील एक विशेष विधी आहे, जी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी केली जाते. जाणून घेऊया रथयात्रेपूर्वी करण्यात आलेल्या या खास विधीची वैशिष्ट्ये.
देव स्नान पौर्णिमा हा भगवान जगन्नाथाच्या भक्तांसाठी एक खास आणि शुभ सण आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो, जो यावर्षी २२ जून रोजी येतो. या शुभ दिवशी भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांच्या दिव्य मूर्तींना विशेष स्नान केले जाते. स्नानापूर्वी या तिघांची भव्य आणि आकर्षक मिरवणूक काढली जाते. म्हणूनच त्याला स्नान यात्रा असे म्हणतात. जाणून घेऊया या विधीची वैशिष्ट्ये.
share
(1 / 6)
देव स्नान पौर्णिमा हा भगवान जगन्नाथाच्या भक्तांसाठी एक खास आणि शुभ सण आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो, जो यावर्षी २२ जून रोजी येतो. या शुभ दिवशी भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांच्या दिव्य मूर्तींना विशेष स्नान केले जाते. स्नानापूर्वी या तिघांची भव्य आणि आकर्षक मिरवणूक काढली जाते. म्हणूनच त्याला स्नान यात्रा असे म्हणतात. जाणून घेऊया या विधीची वैशिष्ट्ये.(ANI)
रथयात्रेपूर्वी होतो सोहळा : ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या जगप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाते. काही लोक हा सण भगवान जगन्नाथाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा करतात. या विधीत जगन्नाथ मंदिरातील देवतांची म्हणजेच भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली जाते. हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातून भाविक पुरीत येतात.
share
(2 / 6)
रथयात्रेपूर्वी होतो सोहळा : ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या जगप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाते. काही लोक हा सण भगवान जगन्नाथाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा करतात. या विधीत जगन्नाथ मंदिरातील देवतांची म्हणजेच भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली जाते. हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातून भाविक पुरीत येतात.(PTI)
देव स्नान पौर्णिमेचे मुख्य विधी : ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या रत्नसिंहासनातून भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांच्या मूर्ती काढल्या जातात. मंत्रोच्चार आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीत तिन्ही देवतांच्या मूर्ती विशेष स्नान वेदीवर आणल्या जातात. यालाच पहांडी मिरवणूक म्हणतात. 
share
(3 / 6)
देव स्नान पौर्णिमेचे मुख्य विधी : ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या रत्नसिंहासनातून भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांच्या मूर्ती काढल्या जातात. मंत्रोच्चार आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीत तिन्ही देवतांच्या मूर्ती विशेष स्नान वेदीवर आणल्या जातात. यालाच पहांडी मिरवणूक म्हणतात. (PTI)
विशेष विहीरीतून पाणी घेतले जाते : तिन्ही देवतांना स्नान करण्यासाठी वापरले जाणारे पाणी जगन्नाथ मंदिरातील एका विशेष विहिरीतून घेतले जाते. या पाण्यात विशेष औषधी वनस्पती आणि सुगंधी पदार्थ मिसळले जातात. देवतांना सुगंधी स्नान करण्यासाठी १०८ कलांचा वापर केला जातो. 
share
(4 / 6)
विशेष विहीरीतून पाणी घेतले जाते : तिन्ही देवतांना स्नान करण्यासाठी वापरले जाणारे पाणी जगन्नाथ मंदिरातील एका विशेष विहिरीतून घेतले जाते. या पाण्यात विशेष औषधी वनस्पती आणि सुगंधी पदार्थ मिसळले जातात. देवतांना सुगंधी स्नान करण्यासाठी १०८ कलांचा वापर केला जातो. ((एएनआय फोटो))
स्नानविधीनंतर तिन्ही देवतांना सदा बेशा नावाच्या विशेष वेशभूषेने सुशोभित केले जाते. दुपारी त्यांना हत्ती बेशा नावाच्या गणेशाचे रूप म्हणून सुशोभित केले जाते. मग संध्याकाळी हे तिन्ही देव भाविकांना दर्शन देताना दिसतात, ज्याला स्नानमेला म्हणतात. 
share
(5 / 6)
स्नानविधीनंतर तिन्ही देवतांना सदा बेशा नावाच्या विशेष वेशभूषेने सुशोभित केले जाते. दुपारी त्यांना हत्ती बेशा नावाच्या गणेशाचे रूप म्हणून सुशोभित केले जाते. मग संध्याकाळी हे तिन्ही देव भाविकांना दर्शन देताना दिसतात, ज्याला स्नानमेला म्हणतात. (PTI)
रात्री जगन्नाथ मंदिरातील तीन मुख्य देवता मंदिराच्या आवारात असलेल्या एका विशेष निवासस्थानात जातात, ज्याला अनासाचे घर म्हणतात. अनासाच्या घरी मुक्काम करताना जगन्नाथ देव १५ दिवस भक्तांपासून दूर राहतात. त्यानंतर भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांच्या मूर्ती १५ दिवसांनंतर म्हणजे रथयात्रेच्या केवळ एक दिवस आधी सार्वजनिक दर्शनासाठी आणल्या जातात.  
share
(6 / 6)
रात्री जगन्नाथ मंदिरातील तीन मुख्य देवता मंदिराच्या आवारात असलेल्या एका विशेष निवासस्थानात जातात, ज्याला अनासाचे घर म्हणतात. अनासाच्या घरी मुक्काम करताना जगन्नाथ देव १५ दिवस भक्तांपासून दूर राहतात. त्यानंतर भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांच्या मूर्ती १५ दिवसांनंतर म्हणजे रथयात्रेच्या केवळ एक दिवस आधी सार्वजनिक दर्शनासाठी आणल्या जातात.  ( (फोटो: फेसबुक))
इतर गॅलरीज