August Grah Gochar 2024: ऑगस्टमध्ये ४ मोठे ग्रह करणार गोचर! 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत, मिळणार भरपूर पैसा
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  August Grah Gochar 2024: ऑगस्टमध्ये ४ मोठे ग्रह करणार गोचर! 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत, मिळणार भरपूर पैसा

August Grah Gochar 2024: ऑगस्टमध्ये ४ मोठे ग्रह करणार गोचर! 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत, मिळणार भरपूर पैसा

Published Jul 26, 2024 12:36 PM IST

Gochar 2024: ज्योतिषीय अभ्यासानुसार ऑगस्ट महिन्यात बुध, रवि, शुक्र आणि मंगळ यांचे शुभ-अशुभ बदल प्रत्येक राशीमध्ये होतील. या ४ मोठ्या ग्रहांचे संक्रमण काही राशींसाठी शुभ सिद्ध होईल.

Grah Gochar August 2024
Grah Gochar August 2024

August Grah Gochar 2024 Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रह एका ठराविक अंतरानंतर नक्षत्र आणि राशी बदलतात. या हालचालींचा मेष ते मीन या 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. ग्रहांच्या राशीबदलाच्यादृष्टीने ऑगस्ट महिना अत्यंत शुभ ठरणार आहे. हिंदू पंचांगानुसार ५ ऑगस्ट २०२४ रोजी बुध सिंह राशीत वक्री होईल. त्यानंतर १६ ऑगस्ट २०२४ रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. तर २५ ऑगस्ट रोजी धनदाता शुक्र कन्या राशीत गोचर करेल. २६ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषीय अभ्यासानुसार ऑगस्ट महिन्यात बुध, रवि, शुक्र आणि मंगळ यांचे शुभ-अशुभ बदल प्रत्येक राशीमध्ये होतील. या ४ मोठ्या ग्रहांचे संक्रमण काही राशींसाठी शुभ सिद्ध होईल. जाणून घेऊया ऑगस्टमधील या भाग्यशाली राशींबद्दल...

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना लाभदायक ठरणार आहे. या महिन्यात तुमची रखडलेली सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. लव्ह लाईफ आणखीन बहरेल. नोकरदारवर्गाला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. खाजगी आयुष्यात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या अनेक सुवर्णसंधी प्राप्त होतील. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. याकाळात तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. या महिन्यात वैयक्तिक प्रगतीवर लक्ष केंद्रित कराल. आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घ्याल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी मिळून-मिसळून काम कराल. त्यामुळे प्रत्येक कामाचे सकारात्मक परिणाम मिळतील.

सिंह

ऑगस्टमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र हे तीन ग्रह सिंह राशीत विराजमान असणार आहेत. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत शुभ लाभ देणारा ठरेल. नोकरी-व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आयुष्यात तुम्हाला जे हवं ते याकाळात सहजरित्या मिळेल. आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होतील. वैयक्तिक आयुष्यात खेळीमेळीचे वातावरण राहील. समाजात तुमच्या कार्याचे कौतुक होईल. अनेक दिवसांपासून सुरु असलेले मालमत्तेचे वाद मिटतील. जोडीदारासोबतचे भावनिक नाते अधिक दृढ होईल. कष्टाचे फळ मिळेल. याकाळात प्रत्येक क्षेत्रात अफाट यश संपादन कराल. एखाद्या गोष्टीत अडकलेले पैसे परत मिळतील. आर्थिक बाबतीत नशीब साथ देईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. संपत्तीत वाढ होईल.

वृश्चिक

ऑगस्ट महिना सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येईल. शुक्राच्या प्रभावामुळे वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होतील. प्रेम संबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. भावंडांशी संबंध चांगले राहतील. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक सुवर्णसंधी प्राप्त होतील. न्यायालयीन खटल्यांमध्ये तुमच्या बाजूने निर्णय होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. धन आणि सुखात वाढ होईल. संपूर्ण महिना सुखसोयींमध्ये आरामात जाईल.

मकर

ऑगस्ट महिना मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. शिवाय या काळात आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल. वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळू शकतो. उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांचा ही फायदा होईल. आयुष्यात सकारात्मकता वाढेल. ताणतणावापासून मुक्ती मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा महिना अतिशय शुभ आहे. उद्योग-व्यवसायाचा विस्तार होईल. दांपत्य जीवन सुखी राहील. करिअरमध्ये नव्याने यश मिळेल. आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल.

(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner