मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Astrology : बुध उदय होताच जुळून आले विविध योग! चांगल्या पावसापासून-धनलाभापर्यंत फायदाच फायदा

Astrology : बुध उदय होताच जुळून आले विविध योग! चांगल्या पावसापासून-धनलाभापर्यंत फायदाच फायदा

Jun 29, 2024 09:50 AM IST

Astrology : ग्रहांच्या हालचालींमधून निर्माण होणाऱ्या या शुभ-अशुभ योगांचा मोठा परिणाम राशींवर होत असतो.

Astrology : बुध उदय होताच जुळून आले विविध योग! चांगल्या पावसापासून-धनलाभापर्यंत फायदाच फायदा
Astrology : बुध उदय होताच जुळून आले विविध योग! चांगल्या पावसापासून-धनलाभापर्यंत फायदाच फायदा

ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा उदय आणि अस्त या प्रक्रिया सतत पाहायला मिळतात. ग्रहांच्या अस्त होण्याने अनेक अशुभ योग निर्माण होतात. तर दुसरीकडे ग्रहांच्या उदयाने अनेक शुभ योग निर्माण होतात. ग्रहांच्या हालचालींमधून निर्माण होणाऱ्या या शुभ-अशुभ योगांचा मोठा परिणाम राशींवर होत असतो. काही राशींना याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. तर काही राशींना सकारात्मक प्रभाव दिसून येतात. त्यामुळे शास्त्रात ग्रहांचे स्थानबदल, अस्त-उदय या क्रिया अत्यंत महत्वपूर्ण असतात.

दरम्यान व्यापार आणि कलेचे दाता बुध उदयास आले आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे २३ जून २०२४ रोजी बुध आपली स्वराशी मिथुनमध्ये उदित झाले आहेत.मात्र सध्या बुध कर्क राशीत विराजमान आहे. तत्पूर्वी बुध उदय होताच अनेक शुभ योग जुळून येत आहेत. भद्र राजयोग, बुधादित्य राजयोग असे विविध योग वेगवेगळ्या कालावधीत घडून येत आहेत. विशेष म्हणजे या योगांचा फायदा राशीचक्रातील काही राशींना होत आहे.

यंदा होईल चांगला पाऊस

बुध ग्रहाला कला, वाणी, संवाद, धन, व्यापार यांचा कारक समजले जाते. ज्या राशीवर बुधाचा शुभ प्रभाव असतो. त्या राशींना या गुणधर्मांचा पुरेपूर फायदा मिळतो. तसेच त्या राशीच्या गुणधर्मांचा प्रभाव ग्रहावरसुद्धा दिसून येतो. सध्या बुध कर्क राशीत विराजमान आहे. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्रामध्ये जल तत्व आहेत. त्यामुळे हे तत्व पाऊसपाण्यासाठी पूरक असतात. शिवाय कर्क राशीत शुक्रसुद्धा प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि बुधाच्या संयोगांने पावसाचा योग जुळून येत आहे. त्यामुळेच यंदा चांगला पाऊस होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

बुध उदयचा कोणत्या राशींना होणार फायदा?

बुध उदयाचा फायदा वृषभ, मिथुन, सिंह, कुंभ आणि तूळ राशीच्या लोकांना होणार आहे. याकाळात तुमच्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची पातळी वाढेल.तुम्हाला पैसे कमविण्याच्या नवनवीन संधी मिळतील. याशिवाय तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. उत्पन्नात पूर्वीपेक्षा अधिक वाढ होईल.

ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला व्यवसाय आणि शेअर बाजारातून चांगला नफा मिळू शकेल. तुम्ही उर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्य चांगले राहील. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. एकंदरीत हा काळ या पाच राशींसाठी अतिशय लाभदायक असणार आहे.

WhatsApp channel