मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Crystal Garland : या ३ राशीच्या लोकांनी गळ्यात धारण करावी स्फटिक माळ! लाभ पाहून वाटेल आश्चर्य

Crystal Garland : या ३ राशीच्या लोकांनी गळ्यात धारण करावी स्फटिक माळ! लाभ पाहून वाटेल आश्चर्य

Jun 11, 2024 01:05 PM IST

Astrology About Crystal Garland : कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी एकदा जोतिष तज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांनी स्फटिक माळ घालावी.

ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांनी स्फटिक माळ घालावी
ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांनी स्फटिक माळ घालावी

ज्योतिषशास्त्र हे एक समृद्ध शास्त्र आहे. यामध्ये मनुष्याच्या आयुष्याशी निगडित विविध दोषांवर उपाय सूचित करण्यात आले आहेत. यामध्ये राशीभविष्य, समुद्रशास्त्र, अंकभविष्य, रत्नशास्त्र असे अनेक भाग आहेत. जोतिषशास्त्रानुसार एखादा व्यक्ती ग्रहदोषाने त्रस्त असेल तर त्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील विशिष्ट उपाय म्हणून रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे रत्न धारण केल्याने ग्रहदोष नाहीसा होत असल्याची मान्यता आहे.

विशिष्ट रत्न धारण केल्यास आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतात. आयुष्यात जर सतत अडचणी आणि अधोगती होत असेल, तर त्यावर जोतिषीय पद्धतीने उपाय करण्यावर अनेक लोक भर देत असतात. प्रचंड कष्ट आणि प्रयत्न करूनसुद्धा यश मिळत नसेल, तर त्यासाठी ग्रहदोष एकदा तपासणे योग्य ठरते. मात्र कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी एकदा ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. चुकीचे रत्न धारण केल्यास त्याचे नकारात्मक परिणामसुद्धा भोगावे लागू शकतात. आज आपण ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीने स्फटिक माळ धारण केल्याने काय लाभ होतात ते जाणून घेणार आहोत.

या राशीच्या लोकांनी स्फटिक माळ घालावी

मिथुन

ज्योतिष अभ्यासानुसार मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या गळ्यात स्फटिकची माळ धारण केल्यास विशेष लाभ पाहायला मिळतात. कारण स्फटिकला बुद्धी आणि ज्ञानाचे रत्न समजले जाते. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडून बुद्धिमत्ता वाढते. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या करिअरमध्ये दिसून येतो. तुमची आर्थिक प्रगती होते. शिवाय स्फटिक धारण केल्याने या राशीच्या लोकांचे मन एकाग्र आणि शांत राहते.

कर्क

कर्क राशीच्या लोकांनी स्फटिकची माळ धारण केल्याने आरोग्य उत्तम राहते. जुनी दुखणी नाहीशी होतात आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. कोणत्याही कामात उत्साह वाटू लागतो. त्यामुळे प्रगतीची दारे खुली होतात. मात्र शास्त्रानुसार या व्यक्तींनी सोमवार किंवा शुक्रवारच्या दिवशी स्फटिकची माळ धारण करणे अत्यंत शुभ असते.

कन्या

कन्या राशीच्या लोकांनीसुद्धा स्फटिक माळ धारण केल्याने विशेष फळ मिळते. बुध ग्रह हा कन्या राशीचा स्वामी ग्रह असतो. बुधाला बुद्धी, विवेक आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. स्फटिकसुद्धा बुद्धी आणि ज्ञान प्रदान करत असते. त्यामुळे या राशीला त्याचा दुहेरी फायदा मिळतो. नव-नव्या क्षेत्रात प्रगती होते. कलागुणांना वाव मिळतो. तसेच तुमचे व्यक्तिमत्व आणखी प्रभावी बनते.

WhatsApp channel