मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ratna Jyotish : मंगळ दोषापासून मुक्तीसाठी 'हे' रत्न आहे फायदेशीर! धारण करण्यापूर्वी पाहा नियम

Ratna Jyotish : मंगळ दोषापासून मुक्तीसाठी 'हे' रत्न आहे फायदेशीर! धारण करण्यापूर्वी पाहा नियम

Jun 18, 2024 03:20 PM IST

Ratna Jyotish : रत्नशास्त्रात मंगळ दोष दूर करुन मंगळचा शुभ प्रभाव जागृत करण्यासाठी काही विशेष रत्न सुचविण्यात आले आहेत.

रत्न ज्योतिष
रत्न ज्योतिष

वैदिक शास्त्रानुसार कुंडलीतील मंगळच्या अशुभ प्रभावाने वैवाहिक आयुष्यात समस्या येतात. शिवाय विवाह जुळण्यास विलंब होतो. नातेसंबंध जुळताजुळता बिघडतात. त्यामुळे कुंडलीतील मंगळ दोष वेळीच दूर करणे गरजेचे आहे. रत्नशास्त्रात मंगळ दोष दूर करुन मंगळचा शुभ प्रभाव जागृत करण्यासाठी काही विशेष रत्न सुचविण्यात आले आहेत. मात्र हे रत्न ज्योतिषांच्या सल्ल्यानेच धारण करावे. विशेष म्हणजे योग्य नियमाने धारण करणे आवश्यक असते. अथवा त्याचा लाभ मिळण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते.

ज्योतिषीय अभ्यासानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रह अशुभ परिणाम देत असेल तर त्यावर एक रत्न अत्यंत फायदेशीर ठरते. रत्न शास्त्रानुसार मुंगा हे रत्न मंगळदोषापासून दिलासा देऊ शकतो. हे रत्न धारण केल्यास मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव संपुष्ठात येतो. आणि शुभ प्रभाव सुरु होतो. त्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य तर सुखद होतेच. शिवाय विवासाठी इच्छुक असणाऱ्यांचे विवाह जुळण्यास मदत होते. त्यामुळे रत्न शास्त्रात मंगळ दोष असणाऱ्यांनी मुंगा रत्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रत्न शास्त्रात मुंगा या रत्नाला लाल कोरलदेखील म्हटले जाते. हे रत्न मंगळ ग्रहाशी खास संबंधित आहे. त्यामुळे त्याच्या वापराने मंगळदोष मोठ्या प्रमाणात नाहीसा होतो. विशेष म्हणजे मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह असल्याने. या दोन राशींना मुंगा परिधान केल्याने विशेष लाभ मिळतो. शास्त्राप्रमाणे मुंगा रत्न कोणीही धारण केले तर चालते. मात्र मेष आणि वृश्चिक राशी या रत्नामुळे जास्त फायद्यात राहतात.

मुंगा रत्न धारण करण्याचा योग्य नियम

रत्न शास्त्रानुसार कोणतेही रत्न हातात, गळ्यात धारण करण्यापूर्वी त्याचे नियम आणि फायदे पाहणे आवश्यक असते. शास्त्रामध्ये विविध व्यक्तीसाठी विविध रत्न सांगण्यात आली आहेत. मर जर एखाद्या व्यक्तीने आपल्या अडचणीनुसार आणि राशीनुसार सोयीस्कर रत्न न धारण केल्यास त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. त्यामुळेच मुंगा रत्न धारण करताना सर्वप्रथम ज्योतिषीय सल्ला अवश्य घ्या. मंगळ दोष असणाऱ्या लोकांनी तांब्याच्या किंवा सोन्याच्या अंगठीत हे रत्न धारण करावे. त्यामुळे त्याचा विशेष लाभ मिळेल. हे रत्न मंगळवारच्या दिवशी धारण करणे अत्यंत शुभ असते. रत्न धारण करण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री दूध आणि गंगाजलमध्ये ही अंगठी बुडवून ठेवावी. त्यांनंतर मंगळवारी हनुमान चालीसा वाचावी आणि हनुमानाची आराधना करावी. नंतर अंगठीला धुवून पुसून घ्यावे. त्यांनंतर अंगठी हातात धारण करावी. मुंगा हे रत्न इंडेक्स किंवा रिंग फिंगरमध्ये घालणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरते.

मुंगा रत्न धारण करण्याचा फायदा

शास्त्रानुसार मुंगा रत्न धारण केल्यास वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होतात. हे रत्न धारण केल्याने त्या व्यक्तीला मनशांती लाभते. हे रत्न वापरल्याने करिअरमध्ये सतत येत असलेल्या अडचणी दूर होतात. आणि नोकरीत प्रगती होते. मुंगा धारण केल्याने आयुष्यात उत्साह, आनंद आणि आत्मविश्वास वाढीस लागतो. सोबतच असेही म्हटले जाते की, मुंगा धारण केल्याने तुमचे नेतृत्वगुण वाढतात. विशेष म्हणजे रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे रत्न अत्यंत फायदेशीर आहे. शिवाय मुंगा धारण केल्याने आयुष्यात असलेली नकारत्मकता दूर होऊन एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

WhatsApp channel