निसर्गात असलेल्या वृक्षांना आपल्या आयुष्यात प्रचंड महत्व आहे. झाडे आणि वनस्पती आपल्या सर्वांना जगण्यासाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन देतात. ते स्वतः प्रदूषण शोषून घेतात आणि आपल्याला मात्र शुद्ध हवा देतात. उन्हाळ्यात थंडगार सावली, अनेक झाडे गोड फळे देतात. शिवाय वाळल्यानंतर लाकूडही देतात. म्हणूनच हिंदू धर्मात वृक्षांची पूजा केली जाते. वड, पिंपळ, आवळा आणि तुळशीची पूजा केली जाते हे जवळजवळ सर्वांनाच माहित आहे.
परंतु काही झाडे अशीही आहेत, ज्यांची पूजा केल्याने तुमचे भाग्य उजळू शकते. आणि फारच कमी लोकांना याबाबत माहिती आहे. वैदिक शास्त्रात अशा काही झाडांच्या नावाचा उल्लेख आहे ज्याची पूजा केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ तर होतोच शिवाय तुमचे नशीब पालटते. या वृक्षांमध्ये सदाबहार अशा खैराच्या झाडाचासुद्धा समावेश आहे. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार खैराच्या झाडाला बृहस्पती देव गुरु ग्रहाशी जोडले जाते. या झाडाला ज्ञान, शिक्षण, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच या झाडाची पूजा केल्याने कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात. आणि तुमच्या आयुष्यावर ग्रहाचा शुभ प्रभाव पडायला सुरुवात होते. शास्त्रानुसार राशीचक्रातील काही राशी अशा आहेत ज्यांना खैराच्या झाडाची पूजा केल्याने प्रचंड लाभ मिळतो. या लोकांचे नशीबच पालटते. त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
वृषभ राशीच्या लोकांना खैराच्या झाडाची पूजा करण्याचा सल्ला ज्योतिष शास्त्रात देण्यात आला आहे. वैदिक शास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी ग्रह स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र हा बृहस्पती देव गुरुचा मित्र ग्रह आहे. अशात वृषभ राशीच्या लोकांनी खैराच्या झाडाची पूजा केल्यास त्यांना गुरु ग्रहाचा शुभ प्रभाव प्राप्त होतो. आणि त्यांच्या आयुष्यात विविध मार्गाने सुखसमृद्धी यायला सुरुवात होते.
ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या लोकांनी खैराच्या झाडाची पूजा केल्याने लाभदायक परिणाम प्राप्त होतात. या लोकांनी खैराच्या झाडाचे पूजन केल्यास त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींपासून सुटका होते. आर्थिक आवक वाढते. त्यामुळे पैशांची चणचण भासत नाही. शिवाय घरात आणि वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी येते. त्यामुळे धनु राशीच्या लोकांनी ज्योतिष्यांच्या सल्ल्याने खैराच्या झाडाचे पूजन करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.
मीन राशीचे स्वामी ग्रह बृहस्पतीदेव गुरु आहेत. शिवाय खैराच्या झाडावरसुद्धा गुरूचा प्रभाव असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांना दुहेरी फायदा मिळतो. मीन राशीच्या लोकांनी खैराच्या झाडाची पूजा केल्याने नशीब चमकते. सौभाग्य प्राप्त होते. शिवाय आर्थिक आवक वाढून धनसंपत्तीत प्रचंड वाढ होते. त्यामुळे या राशीच्या लोकांनीसुद्धा खैराच्या झाडाची पूजा करणे शुभ समजले जाते.