वैदिक शास्त्रानुसार नऊ ग्रह कार्यरत असतात. हे नवग्रह राशींवर प्रभाव टाकत असतात. प्रत्येक ग्रहाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. त्यामुळेच राशींवर वेगवेगळे परिणाम पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रह आणि शुक्र ग्रहाला प्रचंड महत्व आहे. गुरु ग्रहाला देवतांचा गुरु असे संबोधले जाते. तर दुसरीकडे शुक्र ग्रहाला दैत्यांचा गुरु म्हणून संबोधले जाते. हे दोन्ही ग्रह अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळेच यांच्या हालचाली राशींवर मोठा प्रभाव टाकतात. या ग्रहांच्या शुभ-अशुभ हालचालींनाच परिणाम मंगलमय कार्यांवरदेखील पडतो.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठराविक काळात अस्त आणि उदय होत असतात. शुक्र आणि गुरुच्या अस्त होण्याने चांगली कामे थांबवण्यात येतात. ज्योतिष अभ्यासानुसार २८ एप्रिल रोजी शुक्र राशीचक्रातील पहिली आणि महत्वाची राशी मेष राशीत अस्त झाला होता. त्यांनंतर तब्बल १ महिन्याने म्हणजे २९ जून रोजी शुक्र मिथुन राशीत उदय झाला आहे. पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजेच १९ मार्च २०२५ पर्यंत शुक्र आता उदय स्थितीत असणार आहे. शुक्राच्या उदयाने अनेक राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे. पाहूया या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र उदय प्रचंड खास असणार आहे. याकाळात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. मनात ठरविलेली कामे पूर्ण होतील. त्यामुळे आत्मविश्वास प्रचंड वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. अनपेक्षितपणे धनलाभ होईल. आर्थिक आवक वाढून आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकदार वर्गाच्या कामाचे वरिष्ठकांकडून कौतुक होईल. शिवाय तुम्हाला बढती किंवा पगारवाढीचा योग आहे. घरातील वातावरण अगदी खेळीमेळीचे राहील.
मिथुन राशीच्या लोकांना शुक्र उदय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अचानक धनलाभ होतील. मुबलक पैसे आल्याने सुखसुविधांमध्ये वाढ होईल. याकाळात व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होईल. नोकरदार वर्गाला कष्टाचे फळ मिळेल. चांगल्या कामाच्या जोरावर प्रमोशन किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कलाकारांना कलाक्षेत्रात उत्तम संधी मिळेल. मोठे व्यासपीठ प्राप्त होईल. घरात सुखसमृद्धी नांदेल.या राशीच्या काही लोकांना सरकारी नोकरी मिळण्याचा योग आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.
कन्या राशीलासुद्धा शुक्र उदय विशेष फलदायी ठरणार आहे. याकाळात अनेक मार्गाने धनप्राप्ती होईल. अनपेक्षित धनलाभ झाल्याने मन उत्साही राहील. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे परत मिळतील. मनात ठरविलेल्या योजना याकाळात प्रत्यक्षात उतरविण्यात यशस्वी व्हाल. हातात भरपूर पैसा आल्याने भविष्याच्या दृष्टीने बचत कराल.याकाळात तुमच्या वाणीत प्रचंड सकारात्मक बदल होईल. तुमच्या संवाद कौशल्याने लोक प्रभावित होतील. समाजातील तुमची पदप्रतिष्ठा वाढेल प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल.