ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींमधून विविध योगांची निर्मिती होत असते. हे योग राशीचक्रातील बाराही राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव टाकत असतात. बऱ्याचवेळा अनेक शक्तिशाली योग निर्माण होतात. हे राजयोग राशींसाठी प्रचंड फायदेशीर असतात. या राजयोगांच्या प्रभावाने त्या राशींचे अक्षरशः नशीब पालटते. त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त होते. शिवाय आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होते. त्यामुळे शास्त्रात या राजयोगांना अनन्यसाधारण महत्व आहे.
ज्योतिष अभ्यासानुसार, चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे 'गजकेसरी' योगाची निर्मिती होते. हा योग अनेक राशींसाठी शुभ परिणाम देत असतो. येत्या २९ जुलै २०२४ रोजी दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी चंद्र मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर १ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी गुरु वृषभ राशीत गोचर करणार आहे. अशामध्ये चंद्र आणि गुरु एकाच राशीत विराजमान असणार आहेत. अशा स्थितीत गुरु आणि चंद्राच्या एकत्र येण्याने 'गजकेसरी' योगाची निर्मिती होत आहे. यंदाचा गजकेसरी योग अत्यंत शक्तिशाली असणार आहे. या योगात काही राशींना प्रचंड लाभ मिळणार आहे. पाहूया या राशी नेमक्या कोणत्या आहेत.
चंद्र आणि गुरु वृषभ राशीमध्येच विराजमान होऊन गजकेसरी योगाची निर्मिती करणार आहेत. त्यामुळे या राशीला गजकेसरी योगाचा प्रचंड लाभ मिळणार आहे. याकाळात अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण व्हायला सुरुवात होईल. मिळकतीत प्रचंड वाढ होईल. पैशांची आवक वाढल्याने आर्थिक स्थिती भक्कम होईल. एखाद्याला दिलेले कर्ज या काळात परत मिळेल. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने मनात उत्साह वाढेल. व्यापारी वर्गालासुद्धा हा योग लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होऊन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. नोकरदार वर्गाला पदोन्नती आणि पगारवाढ मिळेल.
गजकेसरी योग सिंह राशीच्या लोकांसाठी आनंद आणि भरभराटी घेऊन येणार आहे. याकाळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली दिसून येईल. मनात आखलेल्या योजना प्रत्यक्षात उतरविण्यात यशस्वी व्हाल. अतिरिक्त पैसा कमविण्याची संधी मिळेल. मात्र याठिकाणी तुम्हाला मनावर ताबा ठेवावा लागेल. अथवा चुकीच्या मार्गावर पाऊले पडण्याची शक्यता आहे. मात्र विवेकबुद्धी ठेऊन कार्य केल्यास चांगल्या संधीचे सोने कराल. वैवैहिक आयुष्य सुखी समाधानी राहील. शिवाय घरातील वातावरणसुद्धा आनंदी राहील.
मकर राशीच्या लोकांना गजकेसरी योगाचा विशेष लाभ होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. भागीदारीच्या व्यवसायात लाभच लाभ होणार आहे. शिवाय नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असणाऱ्यांना हा काळ अनुकूल आहे. करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. घरातील वातावरण खेळीमळीचे राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल.