Lucky Car Color: आयुष्यातील भौतिक सुख म्हणजे बंगला, कार, पैसा आपल्यालाही मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेक लोकांचे तर ड्रीम कार घेण्याचे स्वप्न असते. नेमकी कोणती कार खरेदी करावी अशी शंका मनात असते. शिवाय नवीन कार खरेदी करताना, कारचा ब्रँड, मॉडेल, किंमत, वैशिष्ट्ये आणि लूक यासंबंधीचे प्रश्न आपल्या मनात येतात. तसेच कार खरेदी करताना आणखी एक प्रश्न महत्वाचा ठरतो. तो म्हणजे कारचा रंग. अनेक लोक आपल्या, जोडीदाराच्या, कुटुंबाच्या आवडीनुसार अथवा ट्रेंडनुसार कारचा रंग निवडतात. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार कारचा रंग निवडण्याबाबत तुम्ही कधी ऐकला आहात का? जाणून आश्चर्य वाटेल. परंतु, ज्योतिष अभ्यासात कारच्या रंगाबाबतदेखील महत्वाचे सल्ले देण्यात आले आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार, कार खरेदी करताना शुभ मुहूर्त, शुभ दिवस आणि वेळेसोबतच राशीनुसार कारचा रंग निवडण्याचा महत्वाचा सल्ला देण्यात आला आहे. शास्त्रानुसार, रंग मानवी आयुष्यावर मोठा प्रभाव टाकत असतात. आपल्या खास वस्तूंच्या रंगाच्या प्रभावाने आपल्या आयुष्यात सकारात्मक-नकारात्मक बदल घडलेले पाहायला मिळतात. त्यामुळेच कोणतीही गोष्ट खरेदी करताना रंगाचासुद्धा विचार करणे गरजेचे आहे. त्यातल्या त्यात कार खरेदी करताना ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या. आणि राशीनुसारच आपल्या कारचा रंग निश्चित करा. शास्त्रानुसार असे केल्याने तुमच्या आयुष्यात धनसंपत्ती, सुखसमृद्धी तर येतेच. शिवाय मानसिक समाधानसुद्धा लाभते.
मेष राशीच्या लोकांनी निळ्या किंवा त्याच्याशी मिळत्याजुळत्या रंगाची कार खरेदी करणे लाभदायक ठरते.
ज्योतिष अभ्यासानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी पांढऱ्या किंवा क्रीम कलरची कार घेणे शुभ ठरेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हिरव्या किंवा क्रीम रंगाची कार घेणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
कर्क राशीच्या लोकांसाठी लाल, काळ्या आणि पिवळ्या रंगाची कार खरेदी करणे फलदायी ठरू शकते.
सिंह राशीच्या लोकांनी स्लेट किंवा ग्रे रंगाची कार खरेदी केल्यास त्यांच्यासाठी ते अत्यंत लाभदायक ठरेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी पांढऱ्या आणि निळ्या रंगाची कार खरेदी करणे फारच फायद्याचे ठरू शकते.
तूळ राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. या राशीच्या लोकांसाठी काळ्या किंवा तपकिरी रंगाची कार खरेदी करणे चांगले आणि शुभ असते.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पांढऱ्या रंगाची कार खरेदी करणे अत्यंत लाभदायक सिद्ध होते.
धनु राशीच्या लोकांसाठी लाल आणि सिल्व्हर रंगाची कार खरेदी करणे फारच शुभ मानले जाते.
मकर राशीच्या लोकांसाठी पांढऱ्या, राखाडी आणि स्लेटी रंगाची कार खरेदी करणे शुभ असते.
कुंभ राशीच्या लोकांसाठी राखाडी, पांढरा, निळा, हिरवा आणि पिवळा रंग शुभ समजला जातो. या राशीच्या लोकांसाठी यापैकी कोणत्याही रंगाची कार शुभ ठरू शकते.
मीन राशीच्या लोकांसाठी पांढऱ्या, पिवळ्या आणि केशरी रंगाची कार खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.
संबंधित बातम्या